बॉलिवूडमध्ये काय चाललंय? डिंपल कपाडियाच्या घरातून बाहेर पडले सनी देओल अन् अमृता सिंग; चर्चा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 11:24 AM2023-08-30T11:24:17+5:302023-08-30T11:25:35+5:30

८० च्या दशकातील चर्चेतील कलाकार एकत्र दिसले, चर्चांना उधाण

Sunny Deol steps out of Dimple Kapadia s house Amrita Singh also spotted | बॉलिवूडमध्ये काय चाललंय? डिंपल कपाडियाच्या घरातून बाहेर पडले सनी देओल अन् अमृता सिंग; चर्चा सुरु

बॉलिवूडमध्ये काय चाललंय? डिंपल कपाडियाच्या घरातून बाहेर पडले सनी देओल अन् अमृता सिंग; चर्चा सुरु

googlenewsNext

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गदर 2' मुळे सनी देओलचा (Sunny Deol) भाव वधारला आहे. बऱ्याच काळापासून फारसा चर्चेत नसलेला अभिनेता सनी देओल सिनेमाच्या यशामुळे अचानक प्रसिद्धीझोतात आला आहे. २००१ साली आलेला 'गदर एक प्रेम कथा'  सगळ्यांनाच आवडला होता. याचाच फायदा 'गदर 2'ला देखील झाला. सनी रातोरात बॉलिवूडमध्ये पुन्हा अॅक्टिव्ह झाला आहे. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे सनीला नुकतंच अभिनेत्री अमृता सिंग (Amrita Singh) आणि डिंपल कपाडियासोबत (Dimple Kapadia) पाहिलं गेलं. यामुळे बॉलिवूडमध्ये चर्चेला उधाण आलंय.

सनी देओल अनेक दिवसांपासून 'गदर 2' ला प्रमोट करताना दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी मुलाखतीही देत आहे. आता सनी देओल वेगळ्या कारणाने चर्चेत आलाय. त्याला नुकतंच डिंपल कपाडियाच्या जुहू येथील घराबाहेर पाहिलं गेलं. याचवेळी अभिनेत्री अमृता सिंगचीही झलक दिसली. हे तिघेही नेमके कशासाठी एकत्र आले असा प्रश्न सगळ्यांना पडला. 'गदर 2'  चं स्क्रीनिंग की सक्सेस पार्टी की नव्या प्रोजेक्टची चर्चा असे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या चर्चांमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

सनी देओल डिंपलच्या घरातून बाहेर पडताच कारमध्ये बसला. तर अमृता आणि डिंपलला एकाच कारमधून निघताना पाहिले गेले. यावेळी पापाराझींनी त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिघांनीही कॅमेऱ्यासमोर येणं टाळलं. यानंतर सनी देओलने पीव्हीआर गाठलं. तर नंतर डिंपललाही पीव्हीआरबाहेर पाहिलं गेलं. डिंपलने नक्की 'गदर 2' पाहिला की जावयाचा 'OMG 2' असे प्रश्न विचारण्यात आले.

८० च्या दशकात सनी देओल आणि डिंपल कपाडिया रिलेशनशिपमध्ये होते. तेव्हा सनी देओल विवाहित होता. मात्र दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. 'आग का गोला','मंजिल मंजिल','नरसिम्हा' या सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं आहे. ११ वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते अशाही चर्चा होत्या. आता इतक्या वर्षांनी या जुन्या जोड्या पुन्हा एकत्र आल्या आहेत. 

Web Title: Sunny Deol steps out of Dimple Kapadia s house Amrita Singh also spotted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.