सनी देओलने नाकारलेल्या चित्रपटाने घडवलं या अभिनेत्याचं आयुष्य; आज आहे बॉलिवूडचा 'बादशाह'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:36 IST2025-09-25T12:36:25+5:302025-09-25T12:36:59+5:30

Sunny Deol : अभिनेता सनी देओल सध्या बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्याचे चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, सनी देओलने नाकारलेल्या एका चित्रपटाने दुसऱ्या एका अभिनेत्याचं आयुष्य घडवलं होतं?

sunny deol rejected deewana shah rukh khan got this film and now a bollywood king | सनी देओलने नाकारलेल्या चित्रपटाने घडवलं या अभिनेत्याचं आयुष्य; आज आहे बॉलिवूडचा 'बादशाह'

सनी देओलने नाकारलेल्या चित्रपटाने घडवलं या अभिनेत्याचं आयुष्य; आज आहे बॉलिवूडचा 'बादशाह'

बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सध्या सर्वत्र चर्चेत आहे. 'गदर २' चित्रपटानंतर त्याने अशी जबरदस्त कमबॅक केलं आहे. आता त्याच्याकडे चित्रपटांची रांग लागली आहे. तो एकामागून एक चित्रपट साइन करत असून आपल्या अभिनयाने सगळ्यांना प्रभावित करत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, सनीने १९९२ मध्ये आलेल्या एका चित्रपटाला नकार दिला होता, ज्यामुळे एका अभिनेत्याला स्टारडम मिळालं आणि आज तो बॉलिवूडचा 'बादशाह' बनला आहे. ज्या अभिनेत्याचं आयुष्य या चित्रपटाने घडवलं, तो दुसरा कोणी नसून शाहरुख खान (Shah Rukh Khan) आहे.

शाहरुख खानने 'दीवाना' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. या चित्रपटात ऋषी कपूर आणि दिव्या भारती मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटासाठी सनी देओल पहिली पसंती होता, पण त्याने या भूमिकेसाठी नकार दिला, त्यानंतर हा चित्रपट शाहरुख खानच्या वाट्याला आला. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानसुद्धा हा चित्रपट साईन करण्यास घाबरत होता, कारण हा चित्रपट नवीन निर्माते बनवत होते. पण जेव्हा ऋषी कपूर यांनी हा चित्रपट साईन केला, तेव्हा शाहरुख खाननेसुद्धा तो करण्याचा निर्णय घेतला.

पहिलाच चित्रपट ठरला ब्लॉकबस्टर
पहिल्याच चित्रपटाने शाहरुख खानचं नशीब बदललं. त्याचा पहिलाच चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. 'दीवाना'मध्ये शाहरुख खानला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. 'दीवाना'च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास, ४ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात १३ कोटी रुपयांची कमाई केली होती. 

शाहरुख खानचे आगामी प्रोजेक्ट
शाहरुख खानला नुकताच राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हा त्याच्या करिअरमधील पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे. त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, तो लवकरच 'किंग' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याची मुलगी सुहाना खान देखील त्याच्यासोबत दिसणार आहे.

Web Title : सनी देओल की ठुकराई फिल्म ने शाहरुख खान को बनाया 'बादशाह'

Web Summary : सनी देओल ने 'दीवाना' को नकारा, जिससे शाहरुख खान स्टार बने। फिल्म ब्लॉकबस्टर रही, जिससे खान का करियर शुरू हुआ। अब वह बेटी सुहाना के साथ 'किंग' में दिखेंगे।

Web Title : Sunny Deol's Rejected Film Shaped Shah Rukh Khan's Bollywood Destiny

Web Summary : Sunny Deol rejected 'Deewana,' paving the way for Shah Rukh Khan's stardom. The film became a blockbuster, launching Khan's successful career. He is now working on 'King' with his daughter Suhana.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.