"इंडस्ट्रीत पॉलिटिक्स केलं जातं...", गोविंदाच्या पत्नीने सांगितलं भयाण वास्तव, म्हणाल्या-"लोक पाठीमागे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 09:14 IST2025-05-13T09:12:56+5:302025-05-13T09:14:02+5:30
"इंडस्ट्रीत भेदभाव...", सुनीता अहुजा यांनी मांडली व्यथा, म्हणाल्या-"अनेकांनी गोविंदाबद्दल..."

"इंडस्ट्रीत पॉलिटिक्स केलं जातं...", गोविंदाच्या पत्नीने सांगितलं भयाण वास्तव, म्हणाल्या-"लोक पाठीमागे..."
Sunit Ahuja : बॉलिवूडचा हिरो नं-१ म्हणजेच अभिनेता गोविंदा (Govinda) मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. लग्नाच्या ३७ वर्षानंतर गोविंदा पत्नी सुनीता अहुजा यांच्यासोबत घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या परसरत होत्या. त्यांच्या या निर्णयाने सगळ्यांच्या भूवया उंचावल्या होत्या. परंतु, या सगळ्या अफवा असल्याचं म्हणत गोविंदाची पत्नी सुनीताने या बातम्यांचं खंडण केलं होतं. तसंच त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना देखील चांगलचं सुनावलं. दरम्यान, सुनीता अहुजा यांनी अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
नुकतीच सुनीता अहुजा यांनी 'झुम'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी गोविंदा सेटवर उशीरा जायचा, असे अनेकांचे दावे फेटाळले आहेत. शिवाय गोविंदाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पॉलिटिक्सचा सामना केला. असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. त्यादरम्यान, मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या, "अनेकांनी इंडस्ट्रीत गोविंदाबद्दल अफवा पसरवल्या. जेव्हा गोविंदा सेटवर जायचा आणि लोक त्याच्या पाठीमागे त्याच्याबद्दल वाईट बोलायचे. गोविंदासोबत खूप पॉलिटिक्स झालं आहे. गरीब व्यक्तीला प्रसिद्ध किंवा यशस्वी होताना कोणीही पाहू शकत नाही." त्यानंतर सुनीता म्हणाल्या, "गोविंदाचे अनेक चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच बंद करण्यात आले. पण, का? तर तो सुपरस्टार एक होता. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही. पण, इंडस्ट्रीत पॉलिटिक्स होतं. "
मुलांच्या करिअरबद्दल सुनीता अहुजा म्हणाल्या-
"टीनाने खूप स्ट्रगल केला आहे. टीना आणि यश दोघांनी स्वत: च्या मेहनतीवर सगळं मिळवलं आहे. प्रत्येकाचा गॉडफादर आहे, परंतु माझ्या मुलांच्या बाबतीत असं काही नाही. मी माझ्या मुलांना स्पष्ट सांगून ठेवलंय की, गोविंदाकडून अशी कोणतीही अपेक्षा करू नका की तो तुमच्यासाठी काम मागेल किंवा निर्मात्यांना कॉल करेल. तुम्हाला जे काही करायचं आहे ते स्वत: च्या मेहनतीच्या जोरावर करायचं आहे. गोविंदाचा कोणीही गॉडफादर नाही. त्याने जे काही यश मिळवलंय ते त्याच्या हिमतीने मिळवलं आहे. जर नशीबात असेल तर तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय यश मिळवू शकता." असा खुलासा त्यांनी केला.