गोविंदाला खरंच होती 'अवतार'ची ऑफर? बायकोनेच केली पोलखोल, म्हणाली- "मी खोटं बोलणार नाही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 11:28 IST2025-06-25T11:27:36+5:302025-06-25T11:28:01+5:30

बॉलिवूड गाजवणाऱ्या गोविंदाने हॉलिवूडच्या अवतार सिनेमाचीही ऑफर असल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत केला होता. ही ऑफर नाकारल्याचंही त्याने म्हटलं होतं. मात्र आता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा यांनीच त्याची पोलखोल केली आहे. 

sunit ahuja reveald was really govinda gets an offer of hollywood movie avtaar | गोविंदाला खरंच होती 'अवतार'ची ऑफर? बायकोनेच केली पोलखोल, म्हणाली- "मी खोटं बोलणार नाही..."

गोविंदाला खरंच होती 'अवतार'ची ऑफर? बायकोनेच केली पोलखोल, म्हणाली- "मी खोटं बोलणार नाही..."

अभिनय आणि स्पेशल डान्स स्टाइलने बॉलिवूडचं ८०-९०चं दशक गाजवणारा अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आला आहे. गोविंदाचा स्टारडम मोठा आहे. बॉलिवूड गाजवणाऱ्या गोविंदाने हॉलिवूडच्या अवतार सिनेमाचीही ऑफर असल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत केला होता. ही ऑफर नाकारल्याचंही त्याने म्हटलं होतं. मात्र आता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा यांनीच त्याची पोलखोल केली आहे. 

सुनिता अहुजा यांनी नुकतीच उर्फी जावेदच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये सुनिता अहुजा यांनी गोविंदाची पोलखोल केली. "गोविंदाला खरंच अवतारची ऑफर होती का?" या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं. त्या म्हणाल्या, "मला खरंच माहीत नाही त्याला कधी हा सिनेमा ऑफर झाला होता. गोविंदा आणि मी ४० वर्षांपासून एकत्र राहत आहोत. अवतार सिनेमाचे प्रोड्युसर आणि डायरेक्टर कधी आले मला माहीत नाही. त्याला सिनेमा ऑफर झालेला की नाही हेदेखील मला माहीत नाही. मी खोटं बोलणार नाही. मी कोणाची बाजूही घेणार नाही. आणि खोट्या व्यक्तींना प्रोत्साहनही देणार नाही". 

काय म्हणाला होता गोविंदा? 

मी अमेरिकेत एका सरदारजीला भेटलो होतो. त्यांना मी एक बिजनेस आयडिया दिली होती ज्यामुळे त्यांना फायदा झाला होता. काही वर्षांनंतर त्यांनी माझी जेम्स कॅमेरुनशी भेट घडवून दिली. जेम्स कॅमरुन यांनी मला डिनरसाठी बोलवलं होतं. मी सिनेमाचं नाव सुचवलं - अवतार. जेम्स यांनी मला सांगितलं सिनेमाचा हिरो दिव्यांग आहे. त्यामुळे मी या सिनेमासाठी नकार दिला. त्यांनी मला १८ कोटी रुपये मानधन मिळेल असं सांगितलं होतं. 

Web Title: sunit ahuja reveald was really govinda gets an offer of hollywood movie avtaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.