सुनील शेट्टीचा लेक अहान मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट? 'बॉर्डर २' अभिनेत्याने सांगितलं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 10:14 IST2025-11-14T10:12:13+5:302025-11-14T10:14:00+5:30
Sunil Shetty's son Ahan Shetty is dating a Marathi actress: सुनील शेट्टीचा मुलगा आणि अभिनेता अहान शेट्टी सध्या चर्चेत आला आहे. म्हणे, तो वेड सिनेमात झळकलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करतो आहे. दरम्यान आता या चर्चेवर अभिनेत्याने मौन सोडले आहे.

सुनील शेट्टीचा लेक अहान मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट? 'बॉर्डर २' अभिनेत्याने सांगितलं सत्य
सुनील शेट्टीचा मुलगा आणि अभिनेता अहान शेट्टी सध्या चर्चेत आला आहे. म्हणे, तो वेड सिनेमात झळकलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करतो आहे. दरम्यान आता या चर्चेवर अभिनेत्याने मौन सोडले आहे. त्याच्या टीमने एक स्टेटमेंट रिलीज केले आहे, ज्यातून तो सध्या त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. ही अभिनेत्री कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर आम्ही तुम्हाला सांगतो, ती कोण आहे.
अहान शेट्टी वेड सिनेमात झळकलेली अभिनेत्री जिया शंकरला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. या वृत्तावर अहानने प्रतिक्रिया दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अहान शेट्टी आणि जिया शंकरच्या डेटिंगच्या वृत्तावर अभिनेत्याच्या टीमने सांगितले की, या डेटिंगच्या चर्चा पूर्णपणे निराधार आहेत. अहान सध्या कोणालाच डेट करत नाही आहे. त्याने त्याचे पूर्ण लक्ष कामावर केंद्रीत केले आहे. त्याच्याकडे बरेच प्रोजेक्ट्स आहेत. यात बॉर्डर २ सिनेमाचादेखील समावेश आहे. मात्र अद्याप या वृत्तावर जिया शंकरची कोणतीच प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
अहान शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल
२०२१ मध्ये अहान शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याचा पहिला चित्रपट साजिद नाडियाडवालाचा तडप होता, ज्यामध्ये त्याने अभिनेत्री तारा सुतारियासोबत रोमान्स केला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. त्यानंतर तो कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. अहान पांडे आता सनी देओलच्या आगामी बॉर्डर २ चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. बॉर्डर २ पुढील वर्षी २२ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
जिया शंकरच्या वर्कफ्रंटबद्दल
जिया शंकर वेड सिनेमात झळकली होती. ती पिशाचिनी आणि काटेलाल अँड सन्ससारख्या मालिकांमध्येही दिसली आहे. बिग बॉस ओटीटी २ या रिएलिटी शोने तिला छोट्या पडद्यावरही बरीच प्रसिद्धी मिळाली. जिया शंकर सोशल मीडियावरही खूप सक्रीय आहे, जिथे तिने अनेकदा तिच्या सीक्रेट बॉयफ्रेंडचा उल्लेख केला आहे. परंतु अहानच्या टीमने हे स्पष्ट केले आहे की जिया अहानसोबत रिलेशनशीपमध्ये नाही.