सुनील शेट्टीचा 'पहलवान'धील दमदार लूक आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 12:58 IST2019-07-30T12:34:26+5:302019-07-30T12:58:58+5:30

कृष्णा दिग्दर्शित पहलवान चित्रपटातील 'जय हो पहेलवान' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Sunil shetty's look out from pehlwaan movie | सुनील शेट्टीचा 'पहलवान'धील दमदार लूक आऊट

सुनील शेट्टीचा 'पहलवान'धील दमदार लूक आऊट

कृष्णा दिग्दर्शित पहलवान चित्रपटातील 'जय हो पहेलवान' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटातील अभिनेता सुनील शेट्टीचा दमदार फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटात अभिनेता सुनील शेट्टी कन्नड सुपरस्टार सुदीपासह बऱ्याच काळानंतर स्क्रिनवर शेअर करतोय. 'जय हो पहेलवान' या गण्याची कोरियोग्राफी गणेश आचार्य यांनी केली असून,सॉन्ग खूपच भव्य दिव्य आहे. व्यास राज, देव नेगी, अमित मटेरेजा यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. या गाण्यात यात तब्बल 500 डान्सर डान्स करताना दिसणार आहेत. 

सुनील शेट्टी म्हणाला " चित्रपटातील मी माझ्या लूकबद्दल आणि भूमिकेबद्दल खूप उत्साहीत असून, मला चित्रपटातील माझा लूक आणि भूमिका खूप आवडली आहे, बऱ्याच दिवसांनंतर डान्स ही करताना खूप मजा आली. 

कृष्णा यांनी दिग्दर्शित स्वपन्ना कृष्णाद्वारे निर्मित आणि झी स्टुडिओजद्वारे प्रस्तुत, हा ऍक्शन ड्रामा चित्रपट हिंदी, कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित केला जाईल. चित्रपटामध्ये ड्रामा ,एक्शन आणि विनोदांच्या मोठ्या प्रमाणावर तड़का लावण्यात आलेला आहे. झी स्टुडिओज आणि आरआरआर मोशन पिक्चर्स द्वारा निर्मित पहलवान चित्रपट 2500 स्क्रिनवर रिलीज करण्यात येणार आहे. हा चित्रपट १२  सप्टेंबर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Sunil shetty's look out from pehlwaan movie