सुनील शेट्टी दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 19:17 IST2020-12-29T19:16:52+5:302020-12-29T19:17:14+5:30

अभिनेता सुनील शेट्टी लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे.

Sunil Shetty will be seen in the role of host, find out about it | सुनील शेट्टी दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत, जाणून घ्या याबद्दल

सुनील शेट्टी दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत, जाणून घ्या याबद्दल

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. तो सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण तो टेलिव्हिजन किंवा रुपेरी पडद्यावर नाही तर रेडिओवरील बिग एफवर सूत्रसंचालन करणार आहे.


अभिनेता सुनील शेट्टीने जवळपास दोन दशके आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.त्यानंतर आता नवीन भूमिकेत त्याच्या चाहत्यांना दिसणार आहे. तो रेडिओवरील नव्या शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. बिग एफएफवरील आगामी शोमध्ये सुनील शेट्टी हेल्थ आणि वेलनेसबद्दल सांगणार आहे. लवकरच सुनील शेट्टी शोच्या रेकॉर्डिंगला सुरूवात करणार आहे. त्याचे चाहते त्याला रेडिओवर शो होस्ट करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.


 सुनील शेट्टी आजही इतका फिट दिसतो. त्याच्या फिटनेसबद्दल त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मी न चुकता रोज सकाळी लवकर उठतो आणि सहा वाजता योगा करतो. मी माझ्या कामात कितीही व्यग्र असलो तरी संध्याकाळी मी जीममध्ये जातो. मी कधीही जीममध्ये गेल्याशिवाय घरी परतत नाही. मी माझ्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देतो.


सुनील शेट्टी शेवटचा पहलवान चित्रपटात दिसला. या चित्रपटाद्वारे त्याने चार वर्षांनंतर चित्रपटसृष्टीत कमबॅक केले आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. 

Web Title: Sunil Shetty will be seen in the role of host, find out about it