लेकीला सिनेमात घेतलं अन् सुनील शेट्टीने थेट बंगलाच गिफ्ट केला; कास्टिंग दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 10:50 IST2024-07-24T10:48:41+5:302024-07-24T10:50:00+5:30

लेकीला सिनेमात काम दिलं म्हणून सुनील शेट्टीने कास्टिंग दिग्दर्शकाला थेट बंगलाच गिफ्ट केला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुकेश छाबडा यांनी याबाबत मोठा खुलासा केला. 

sunil shetty gifted bunglow to mukesh Chhabra after casting his daughter athiya in film | लेकीला सिनेमात घेतलं अन् सुनील शेट्टीने थेट बंगलाच गिफ्ट केला; कास्टिंग दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

लेकीला सिनेमात घेतलं अन् सुनील शेट्टीने थेट बंगलाच गिफ्ट केला; कास्टिंग दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

अभिनयाने ९०चं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सुनील शेट्टी. बॉलिवूडमधील अण्णाच्या मुलगी आणि लेकानेही अभिनयात नशीब आजमावलं होतं. पण, वडिलांसारखी छाप त्यांना पाडता आली नाही. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेत्री अथिया शेट्टीने २०१५ साली हिरो सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. लेकीला सिनेमात काम दिलं म्हणून सुनील शेट्टीने कास्टिंग दिग्दर्शकाला थेट बंगलाच गिफ्ट केला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुकेश छाबडा यांनी याबाबत मोठा खुलासा केला. 

मुकेश छाबडा यांनी नुकतीच भारती सिंह आणि हर्ष लिम्बाचिया यांच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती. यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. "जेव्हा मी कास्टिंग दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली होती. तेव्हा सुनील शेट्टीचा आराम नगर येथे १६० नावाचा एक बंगला होता. तेव्हा मी अथिया शेट्टीबरोबर हिरो नावाचा सिनेमा करत होतो. तू छोट्या ऑफिसमध्ये काम का करत आहेस. माझा आराम नगर येथील बंगला घे, असं सुनील शेट्टी मला म्हणाले. तेव्हा मी त्यांना दबावात आहे, असं म्हणालो. त्यावर ते म्हणाले की टेन्शन घेऊ नकोस. फक्त चांगलं काम कर", असं मुकेश छाबडा म्हणाले. 

पुढे ते म्हणाले, "सुनील शेट्टी त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल कधीच कोणाला सांगणार नाहीत. त्यांनी आराम नगरमधील एवढा मोठा बंगला मला दिला. भाड्याची चिंता करू नकोस. तू माझ्या मुलीसाठी खूप काही केलं आहेस. फक्त हा बंगला ठेवून घे, असं ते म्हणाले. मी तिथे माझं काम सुरू केलं. नवीन ऑफिसचं उद्घाटन केलं. मी जवळच्या मित्रांबरोबर काम केलं आणि कंपनी उभारली. आता चंदिगड, दिल्ली आणि लंडनमध्येही माझं ऑफिस आहे". 

अथियाने २०१५ साली हिरो सिनेमातील अभिनयात पदार्पण केलं होतं. या सिनेमाचं कास्टिंग मुकेश छाबडा यांनी केलं होतं. अथियाबरोबर या सिनेमात आदित्य पांचोली दिसला होता. यानंतर अथियाने मुबारका, मोतीचूर चकनाचूर सारख्या सिनेमात काम केलं आहे. क्रिकेटर के एल राहुलशी लग्न करत तिने संसार थाटला आहे. 

Web Title: sunil shetty gifted bunglow to mukesh Chhabra after casting his daughter athiya in film