क्या बात है..! चक्क धारावीतल्या गल्लीबोळात फिरताना दिसला सुनील शेट्टी, नेटकरी करतायेत त्याचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 13:18 IST2022-06-23T13:14:44+5:302022-06-23T13:18:52+5:30

सुनील शेट्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो धरावीच्या गल्ल्यांमध्ये बॉडीगार्डशिवाय फिरताना दिसतोय. हे पाहून नेटकरी त्याचे कौतुक करतायेत.

Suniel shetty spotted walking inside mumbai biggest slum dharavi watch video | क्या बात है..! चक्क धारावीतल्या गल्लीबोळात फिरताना दिसला सुनील शेट्टी, नेटकरी करतायेत त्याचे कौतुक

क्या बात है..! चक्क धारावीतल्या गल्लीबोळात फिरताना दिसला सुनील शेट्टी, नेटकरी करतायेत त्याचे कौतुक

1992 मध्ये आलेल्या “बलवान” या सिनेमातून अभिनेता सुनिल शेट्टीने बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. एक से बढकर एक भूमिका त्याने साकारत बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. मात्र काही काळानंतर त्याची जादू कमी झाली आणि तो अभिनयापासून दूर गेला. सुनिल शेट्टी आज फारसा सिनेमात झळकत नसला तरी त्याचा बिझनेस आहे. अभिनयापासून दूर जात तो आज बिझनेस करण्यातच बिझी झाला आहे.

 सुनील शेट्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो आशियाची सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये फिरताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सुनील शेट्टी धारावीच्या रस्त्यांवर फिरताना दिसतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी अभिनेत्याचे कौतुक करतायेत. सुनील शेट्टीची शरीरयष्टी पाहून नेटकरी त्याचे भरभरून कौतुक करतायेत. आपल्या आगामी प्रोजेक्टच्या चित्रीकरणासाठी अभिनेता धारावीमध्ये पोहोचला होता.


सुनीलचा हा व्हिडीओ पाहून एका युजरने म्हटलं की, “तो कधीच म्हातारा होऊ शकत नाही.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय, “हा ६० वर्षाचा आहे याच्यावर कोणाचा विश्वास बसेल…” तर काहींना त्याच्या ‘धडकन’ चित्रपटाची आठवण झाली. हा तर अंजलीला शोधत असल्याचं देखील काही लोकांनी कमेंटमध्ये गंमतीने म्हटलं आहे.
 

Web Title: Suniel shetty spotted walking inside mumbai biggest slum dharavi watch video