गायिका सुनिधी चौहानने नवऱ्यासोबत सुरू असलेल्या वादावर सोडलं मौन, म्हणाली - आमच्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 14:06 IST2021-04-24T13:12:30+5:302021-04-24T14:06:26+5:30

बॉलिवूड सिंगर सुनिधी चौहान (Sunidhi Chauhan) सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे

Sunidhi chauhan open up on relationship with husband hitesh sonik | गायिका सुनिधी चौहानने नवऱ्यासोबत सुरू असलेल्या वादावर सोडलं मौन, म्हणाली - आमच्यात...

गायिका सुनिधी चौहानने नवऱ्यासोबत सुरू असलेल्या वादावर सोडलं मौन, म्हणाली - आमच्यात...

बॉलिवूड सिंगर सुनिधी चौहान (Sunidhi Chauhan) सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.  सुनिधी आणि तिचा पती हितेश सोनिकमध्ये  (Hitesh Sonik) वाद निर्माण झाल्याची बातमी बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहे. यावर सुनिधीचा पती पती हितेश सोनिकने माध्यमांशी बोलताना या गोष्टी केवळ अफवा असल्याचे सांगितल्या होते, परंतु सुनिधीने यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. आता तिने यावर आपलं मौनं सोडलं आहे.


ETimes दिलेल्या मुलाखतीत सुनिधी चौहान म्हणाली, ' आमच्यात आता सर्व काही ठीक आहे. मी आणि हितेश सोनिक एकत्र राहतो आहे. मीडिया रिपो्र्टनुसार, 'या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात उलथापालथ झाली होती आणि काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये पॅचअॅप झाले. काही दिवसांपूर्वी दोघे गोव्यात एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेले होते. यानंतरही दोघांच्या लग्नावर  प्रश्न उपस्थित होत होते, ज्यावर उत्तर देणे सुनिधीला योग्य वाटले.

हितेशने केला होता खुलासा
जेव्हा सुनिधी आणि हितेश विभक्त झाल्याच्या बातम्या येते होत्या त्यावर तो म्हणाला होता की,, आम्ही एकाच घरात, एकाच छताखाली एकत्र राहत आहोत. लॉकडाऊनदरम्यान घरातील कामे आम्ही वाटून घेतली आहेत. कदाचित सुनिधी माझ्या घरातील कामांवर खुश नाही, म्हणून अशी चर्चा सुरु झालीय, असे तो हसत हसत म्हणाला होता.


सुनिधी व हितेशच्या लग्नाला नऊ वर्षे झाली आहेत. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 साली दोघांनी लग्न केले होते. गोव्यात या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन दिले होते. लग्नानंतर पाच वर्षांनी सुनिधीच्या मुलाचा जन्म झाला होता. सुनिधी अनेकदा आपल्या मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. हे सुनिधीचे दुसरे लग्न आहे. याआधी सन 2002 मध्ये तिने कोरिओग्राफर बॉबी खानसोबत लग्न केले होते. त्यावेळी ती केवळ 18 वर्षांची होती. मात्र लग्नानंतर उण्यापु-या वर्षभरातच दोघांचा घटस्फोट झाला होता.

Web Title: Sunidhi chauhan open up on relationship with husband hitesh sonik