ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 09:59 IST2025-12-28T09:58:55+5:302025-12-28T09:59:13+5:30
शकिराची कॉपी फसली, सुनिधी चौहान तुफान ट्रोल

ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
गायिका सुनिधी चौहानच्या कॉन्सर्ट्सची सध्या सगळीकडे चर्चा आहे. बॉलिवूड तारे तारका असतील किंवा चाहते सगळेच सुनिधीच्या कॉन्सर्टला हजेरी लावत आहे. काही दिवसांपूर्वी तिचं पुण्यात झालेलं कॉन्सर्ट खूप गाजलं. 'आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे...' हे मराठी प्रेक्षकांचं आवडतं गाणं सुनिधीने स्टेजवर गायलं आणि सगळे मंत्रमुग्ध झाले. संगीतकार अवधूत गुप्तेनेही सुनिधीसाठी पोस्ट शेअर करत तिचे आभार मानले. दरम्यान आता सुनिधी एका कारणाने ट्रोल होत आहे. स्टेजवर तिने आक्राळविक्राळ डान्स स्टेप्स केल्याने नेटकऱ्यांनी तिला सुनावलं आहे.
नुकत्याच झालेल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहान तिचं गाजलेलं 'कमली कमली' गाणं गात होती आणि त्यावर परफॉर्मही करत होती. तिने गुलाबी रंगाचा शायनी टू पीस ड्रेस घातला होता. स्लीट ब्लाऊज आणि मिडी स्कर्ट असा तो आऊटफिट होता. कमली कमली गाताना सुनिधी अचानक विचित्र डान्स स्टेप्स करायला लागली. ती खूप जोशात दिसत होती मात्र तिच्या डान्स स्टेप्स पुरत्या फसल्या. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
'ये क्या था भाई?', 'मिर्गी का दौरा पड गया','सुनिधी छान गाते मस्त आवाज आहे पण ती अजिबात चांगली डान्सर नाही','डॉक्टर काय म्हणाले कधी बरी होशील?','शकिरासारखा नाचण्याचा प्रयत्न करु नको प्लीज','हॉलिवूड गायिकांची कॉपी जमलेली नाही' अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
सुनिधीने नंतर अभिनेत्री सान्या मल्होत्रासोबतही डान्स केला. सगळ्यांनीच सान्याच्या डान्सची स्तुती केली. सुनिधी चौहान प्रसिद्ध बॉलिवूड गायिका आहे. वयाच्या ५ व्या वर्षापासूनच ती गाणं गाते आणि परफॉर्मही करते. १३ व्या वर्षीच तिने 'शस्त्र' सिनेमातून करिअरला सुरुवात केली. आज सुनिधीच्या नावावर अनेक हिट गाणी आहेत.