या मुस्लिम पत्रकारास डेट करतेय हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 15:25 IST2019-06-23T15:24:28+5:302019-06-23T15:25:14+5:30

हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. सुनैनाचे मानाल तर, ती एका मुस्लिम तरूणावर प्रेम करते. पण तिच्या कुटुंबाला हे नाते मान्य नाही. खुद्द सुनैनाने अलीकडे हा खुलासा केला होता.

sunaina roshan is dating a muslim journalist | या मुस्लिम पत्रकारास डेट करतेय हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन?

या मुस्लिम पत्रकारास डेट करतेय हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन?

ठळक मुद्देकाश्मिरच्या एका वेब पोर्टलने यासंदर्भात रूहैलसोबत संपर्क साधला असता, त्याने यावर बोलण्यास नकार दिला.

हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. सुनैनाचे मानाल तर, ती एका मुस्लिम तरूणावर प्रेम करते. पण तिच्या कुटुंबाला हे नाते मान्य नाही. खुद्द सुनैनाने अलीकडे हा खुलासा केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनैना सध्या एका जर्नलिस्टला डेट करतेय. रूहैल अमीन असे त्याचे नाव. रूहैल एक काश्मिरी पत्रकार आहे आणि आधीच विवाहित आहे. उत्तर काश्मिरमध्ये राहणारा रुहैल दिल्लीच्या एका न्यूज ऑर्गनायझेशनसाठी काम करतो.


नुकतेच कंगना राणौतची बहीण रंगोली हिने सुनैनाबद्दल खळबळजनक खुलासा केला होता. सुनैनाचे मुस्लिम व्यक्तिवर प्रेम आहे. त्यामुळे रोशन कुटुंबाने तिचा छळ चालवला असल्याचा आरोप, रंगोलीने  केला होता.  यानंतर खुद्द सुनैना हिनेही पिंकविला या एंटरटेनमेंट पोर्टलशी बोलताना रंगोलीचा हा आरोप खरा असल्याचे सांगितले . माझे एका मुस्लिम व्यक्तिवर प्रेम आहे आणि यामुळे माझा छळ सुरु आहे. माझ्या वडिलांनी यामुळे माझ्यावर हात उचलला. तो दहशतवादी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. माझ्या कुटुंबाने रूहैलचा स्वीकार करावा, अशी माझी इच्छा आहे. त्याच्यासोबत लग्नाबद्दल सध्या मी काहीही सांगू शकत नाही. पण मला त्याच्यासोबत राहायचे आहे. तो मुस्लिम आहे, केवळ यामुळे माझे कुटुंब त्याचा स्वीकार करायला तयार नाही. ते म्हणतात, त्याप्रमाणे तो दहशतवादी असता तर त्याचे फोटो गुगलवर सगळीकडे कसे असते? , असे सुनैनाने यावेळी म्हटले होते. सुनैनाच्या या खुलाशानंतर सगळ्यांनाच धक्का बसला होता.
काश्मिरच्या एका वेब पोर्टलने यासंदर्भात रूहैलसोबत संपर्क साधला असता, त्याने यावर बोलण्यास नकार दिला. माझ्याकडे याबद्दल बोलण्यासारखे काहीही नाही. बॉलिवूडमध्ये लोक काहीही लिहू शकतात, असे तो म्हणाला.

Web Title: sunaina roshan is dating a muslim journalist