म्हणून अनुष्का शर्मा साड्यांच्या प्रेमात, एकाच वेळी ३५ साड्यांची केली खरेदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 10:39 IST2018-09-14T10:36:55+5:302018-09-14T10:39:17+5:30

'सुई धागा' या सिनेमातून वरुण आणि अनुष्काहे दोघंही आजवर कधीही पाहिलं नाही अशा अनोख्या अंदाजात रुपेरी पडद्यावर झळणार आहेत.

Sui Dhaga Actress Anushka Sharma bought More than 35 sarees from Chanderi | म्हणून अनुष्का शर्मा साड्यांच्या प्रेमात, एकाच वेळी ३५ साड्यांची केली खरेदी!

म्हणून अनुष्का शर्मा साड्यांच्या प्रेमात, एकाच वेळी ३५ साड्यांची केली खरेदी!

सिनेमाचं प्रमोशन करण्याचे निरनिराळे फंडे चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतात... छोट्या पडद्यावरच्या शोमध्ये येऊन तर कधी वेगवेगळ्या मॉल आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सिनेमाचं प्रमोशन करण्याचा फंडा हिट झाला असताना अनुष्काने मात्र वेगळी वाट धरलीय. एरव्ही फक्त वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसणारी अनुष्काने चक्क साड्यांच्या शॉपिंगमध्ये बिझी असल्याचे पाहायला मिळतंय. मध्य प्रदेशातील 'चंदेरी' खासकरुन साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिने चंदेरीला जाऊन  एकाच वेळी चक्क ३५ चंदेरी साड्यांची खरेदी केली आहे.

त्यामुळे सध्या अनुष्का साड्यांच्याच प्रेमात असल्याचे पाहायला मिळत आहे. खु्द्द अनुष्काने साड्यांच्या खरेदी केलेल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर होताच अनुष्काच्या या फोटोवर युजर्स संमिश्र प्रतिक्रीया देताना दिसत आहेत. सर्वकाही पब्लिसिटी स्टंट असल्याचे कमेंटसचा भडिमार अनुष्काच्या या फोटोंवर होतोय.
 
'सुई धागा' या सिनेमातून वरुण आणि अनुष्काहे दोघंही आजवर कधीही पाहिलं नाही अशा अनोख्या अंदाजात रुपेरी पडद्यावर झळणार आहेत. या सिनेमात वरुण धवन टेलरच्या भूमिकेत झळकणार असून मौजी असं त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव असेल. दुसरीकडे अनुष्का कपड्यांवर नक्षीकाम (एम्ब्रॉयडरी) करणा-या ममताच्या भूमिकेत झळकणार आहे. 'मेड इन इंडिया' अशी टॅगलाइन असलेल्या या सिनेमाची कथा मध्यप्रदेशात रंगणार आहे. 

या सिनेमातील कथेला न्याय मिळावा यासाठी निर्माता दिग्दर्शक प्रत्येक लहानसहान गोष्टीची खबरदारी घेतली आहे. कलाकारांचे कपडे, वेशभूषापासून सगळ्या गोष्टी रिअल वाटाव्यात आणि सिनेमाची कथा रसिकांच्या काळजात घर करुन जावी यासाठी कोणतीच कसर सोडली  नसल्याचं पाहायला मिळत आहे. शरत कटारिया 'सुई धागा' या सिनेमाचं दिग्दर्शन केले असून यशराज बॅनरचा हा सिनेमा २८ सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे. मात्र वरुण आणि अनुष्काचा हटके लूक तसंच सायकलस्वारीमुळे सिनेमाची आतापासूनच 'सुई धागा' सिनेमाची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

Web Title: Sui Dhaga Actress Anushka Sharma bought More than 35 sarees from Chanderi