सुहाना खानचा ज्युलिएटच्या भूमिकेतला फोटो होतोय व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 15:45 IST2018-12-04T15:27:42+5:302018-12-04T15:45:13+5:30

सुहाना खानचे नाव स्टारकिड्सच्या यादीत सगळ्यातवर आहे. लंडनमध्ये सध्या ती आपलं शिक्षण पूर्ण करतेय. सुहाना सध्या ज्युलिएटच्या भूमिकेमुळे चर्चेत आली आहे.

Suhana Khan's photo viral in Joliet's role! | सुहाना खानचा ज्युलिएटच्या भूमिकेतला फोटो होतोय व्हायरल!

सुहाना खानचा ज्युलिएटच्या भूमिकेतला फोटो होतोय व्हायरल!

ठळक मुद्देसुहानाने कॉलेजमध्ये रोमियो-ज्यूलिएटच्या नाटकामध्ये सहभाग घेतला आहेसुहाना ‘वोग’ मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकली होती

सुहाना खानचे नाव स्टारकिड्सच्या यादीत सगळ्यातवर आहे. लंडनमध्ये सध्या ती आपलं शिक्षण पूर्ण करतेय. सुहाना सध्या ज्युलिएटच्या भूमिकेमुळे चर्चेत आली आहे. सुहानाने कॉलेजमध्ये रोमियो-ज्यूलिएटच्या नाटकामध्ये सहभाग घेतला आहे. यात सुहाना ज्युलिएटची भूमिका साकारणार आहे. ज्युलिएटच्या भूमिकेमधला सुहाना फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.   

 

शाहरुख लेकीच नाटक पाहण्यासाठी लंडनला गेला होता. तिचे काम पाहून तो खूप भारावला. नाटक पाहिल्यानंतर शाहरुखने सुहाना आणि तिच्या टीमचे कौतूक केले आहे. सोशल मीडियावर हा एक खूपच सुंदर अनुभव होता. सगळ्या कलाकारांनी अप्रतिम कामा केले आहे. ज्युलिएटसह संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा.  


काही दिवसांपूर्वी सुहाना ‘वोग’ मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकली होती.  करण जोहर आणि शाहरुखचे खास मैत्रीपूर्ण संबंध असल्याने करणच्या चित्रपटामधूनच सुहाना बॉलिवूडमध्ये एंट्री करणार अशा चर्चा रंगल्या आहेत. सुहानाला अभिनेत्री व्हायचे असल्याचे, तिने काजोलकडून अभिनयाचे बारकावे शिकावे, अशी शाहरुखची इच्छा आहे. याबाबत खुद्द शाहरुखने एका मुलाखतीमध्ये माहिती दिली होती.

Web Title: Suhana Khan's photo viral in Joliet's role!