मिस्ट्री बॉय सोबत स्पॉट झाली सुहाना खान, मीडियाला पाहताच लपवला चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 19:07 IST2022-03-23T19:07:17+5:302022-03-23T19:07:49+5:30

Suhana Khan:सुहाना खानचे व्हायरल झालेला फोटो पाहून चाहते विचारत आहेत की, तिच्यासोबत कारमध्ये बसलेला मुलगा कोण आहे?

Suhana Khan was spotted with Mystery Boy, hiding her face when she saw the media | मिस्ट्री बॉय सोबत स्पॉट झाली सुहाना खान, मीडियाला पाहताच लपवला चेहरा

मिस्ट्री बॉय सोबत स्पॉट झाली सुहाना खान, मीडियाला पाहताच लपवला चेहरा

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि त्याचे कुटुंब गेल्या ६ महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. शाहरुख खानचा चित्रपट असो किंवा त्याच्या मुलांचे वैयक्तिक आयुष्य; चाहत्यांना प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता असते. याच कारणामुळे सुहाना खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) नुकतीच मिस्ट्री बॉयसोबत स्पॉट झाली, तिचे फोटो सध्या वाऱ्यासारखे पसरत आहे. चाहते विचारत आहेत की सुहाना खानसोबत कारमध्ये बसलेला मुलगा कोण आहे?

अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहानाच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंवर चाहते सतत कमेंट करत आहेत. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, 'ही सुहाना खान तिचा चेहरा का लपवत आहे? तिला कशाची भीती वाटते?’ तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘सुहाना खान या मुलाला डेट करत आहे का?’ कारण प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे की किंग खानच्या मुलीच्या आयुष्यात कोणाचा प्रवेश झाला आहे?

अभिनेता शाहरुख खानने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, त्याला त्याच्या मुलीला अभिनेत्री बनवायचे आहे. शाहरुख खानच्या मते, त्याची मुलगी सुहानाला चित्रपटात काम करायचे आहे. आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि तिला प्रत्येक पावलावर साथ देईन, असे शाहरुख म्हणाला होता. सुहाना खान दिग्दर्शिका झोया अख्तरच्या बॅनरखाली बॉलिवूडमध्ये प्रवेश करू शकते अशा बातम्या यापूर्वी आल्या होत्या. तथापि, या वृत्तांना शाहरुख खान किंवा झोया अख्तर यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.

Web Title: Suhana Khan was spotted with Mystery Boy, hiding her face when she saw the media