सुहाना खानने शेअर केलेल्या ग्लॅमरस फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर, शाहरुखची लेक डेब्यू आधीच ठरतेय हिट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 12:18 PM2020-10-07T12:18:37+5:302020-10-07T12:59:51+5:30

शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय स्टार किड्स आहे.

Suhana khan shared latest stunning photo goes viral on internet | सुहाना खानने शेअर केलेल्या ग्लॅमरस फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर, शाहरुखची लेक डेब्यू आधीच ठरतेय हिट

सुहाना खानने शेअर केलेल्या ग्लॅमरस फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर, शाहरुखची लेक डेब्यू आधीच ठरतेय हिट

googlenewsNext

शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय स्टार किड्स आहे. सुहानाने अजून फिल्मी जगात पाऊल सुद्धा ठेवलेलं नाही त्याआधीच ती हिट आहे. कोणत्याना कोणत्या कारणामुळे ती नेहमी चर्चेत असते. अलीकडेच सुहानाला तिच्या सावळ्या रंगावरुन ट्रोल करण्यात आले होते. रंगावरून खिल्ली उडवणा-या हेटर्सला सुहानाने खरमरीत उत्तर दिले होते. नुकताच तिने आपला ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामुळे सुहाना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सुहाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती नेहमी शेअर करत असते. तिला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. नुकत्याच शेअर केलल्या फोटोमध्ये सुहानाने ब्लॅक रंगाचा क्रॉप टॉप घातला आहे आणि त्यासोबत डेनिमची शॉर्ट्स. फोटो सुहाना केसांमधून हात फिरवताना दिसतेय. फोटोवर फॅन्सनी लाईक्चा वर्षाव केला आहे. सुहानाची आई गौरी खानने लेकीच्या फोटोवर हार्टवाली इमोजी शेअर केली आहे. 

सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे.2018 मध्ये तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. या फोटोशूटनंतर सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शाहरुखने या बातम्या धुडकावून लावल्या होत्या.सुहाना सध्या अमेरिकेच्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत शिकतेय. लॉकडाऊनमध्ये ती मुंबईत आपल्या घरी आली आहे. 

सावळ्या रंगामुळे सुहाना खान ट्रोल झाल्यानंतर गौरी खाननेही शेअर केली पोस्ट, म्हणाली.....

Web Title: Suhana khan shared latest stunning photo goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.