भन्नाटच ! शाहरुखची मुलगी सुहानाच्या लग्नासाठी स्थळ आलंय, महिन्याला एक लाखांहूनही जास्त कमावतो मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 20:46 IST2021-05-25T20:41:04+5:302021-05-25T20:46:10+5:30

सुहानाच्या वाढदिवसाच्या दिवशी तिची आई गौरी खान हिने सुहानाचा एक अतिशय ग्लॅमरस फोटो शेअर तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या होत्या.

Suhana Khan Gets Marriage Proposal on Twitter, Fan Says ‘I Earn More Than Rs 1 Lakh a Month’ | भन्नाटच ! शाहरुखची मुलगी सुहानाच्या लग्नासाठी स्थळ आलंय, महिन्याला एक लाखांहूनही जास्त कमावतो मुलगा

भन्नाटच ! शाहरुखची मुलगी सुहानाच्या लग्नासाठी स्थळ आलंय, महिन्याला एक लाखांहूनही जास्त कमावतो मुलगा

सुहाना खान रूपेरी पडद्यावर एंट्री करण्यापूर्वीच लोकप्रिय स्टारकिड आहे.सोशल मीडियावर तिचे लाखोंहून अधिक चाहते आहेत. बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानची लेक सुहाना खान आता २१ वर्षांची झाली आहे.सुहानाच्या वाढदिवसाच्या दिवशी तिची आई गौरी खान हिने सुहानाचा एक अतिशय ग्लॅमरस फोटो शेअर तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या होत्या. 

गौरी खानने शेअर केलेल्या फोटोत सुहाना एका खुर्चीवर बसलेली दिसते आहे. तिने पोलका डॉट ड्रेस परिधान केलाय. फोटो शेअर करू गौरीने लिहिले होते की, तुझ्यावर आज..उद्या आणि कायमच प्रेम राहील. तर गौरीच्या या पोस्टवर सुहानाने देखील आय लव्ह यू अशी कमेंट केली होती. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी सुहानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

 

या सगळ्यांमध्ये मात्र एका चाहत्याने अशी काही कमेंट केली की सारेच थक्क झाले. युजरच्या एका कमेंटने सोशल मीडियावर सा-यांचेच लक्ष वेधून घेतले. चाहत्याने सुहानाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. थेट गौरीला पोस्टवर कमेंट करत म्हटले की, ''गौरी मॅम माझे लग्न सुहानाशी लावून द्या. माझी सॅलरी 1 लाख+ आहे''. 

युजरची कमेंट्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. युजरच्या कमेंटवर इतर नेटीझन्सही मजेशीर कमेंट करत आहेत. काहींनी म्हटले की,फोटोमध्ये सुहानाच्या हातात जी बॅग दिसतेय त्याची किंमतच ३ लाखांहून अधिक असेल. २२ मेला सुहानाने आपला २१ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशी ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. चाहत्यांनीही भरभरुन कमेंट्स आणि लाईक्स देत पसंती दिली.


सुहाना खान सध्या न्यूयॉर्कमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहे. सुहाना खानने आपल्या घराची झलक इंस्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून शेअर करत असते.सुहानाने काही फोटोत आलिशान अपार्टमेंटचा एक भाग दाखवला आहे. ज्यामध्ये सूर्यास्त खूप सुंदर दिसतो. या फोटोत सुहाना खूप सुंदर दिसत आहे. त्यामध्ये 'घर' असा इमोजी शेअर केला होता. सुहाना एखाद्या राजकुमारीसारखे आयुष्य जगते.

Web Title: Suhana Khan Gets Marriage Proposal on Twitter, Fan Says ‘I Earn More Than Rs 1 Lakh a Month’