Suhana Khan Video: "ही तर हुबेहुब शाहरुख खानची कार्बन कॉपी..", सुहाना खानचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 15:22 IST2023-01-19T15:18:47+5:302023-01-19T15:22:02+5:30

सुहाना खान गुरुवारी विमानतळावर दिसली. तिची स्टाइल पाहून लोक तिला शाहरुख खानची कॉर्बन कॉपी म्हणू लागले.

Suhana khan cute video without makeup at airport video fans says shah rukh khan duplicate | Suhana Khan Video: "ही तर हुबेहुब शाहरुख खानची कार्बन कॉपी..", सुहाना खानचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल

Suhana Khan Video: "ही तर हुबेहुब शाहरुख खानची कार्बन कॉपी..", सुहाना खानचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान(Suhana Khan)  ही एक लोकप्रिय स्टारकिड्स आहे. सोशल मीडियावर ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. शिक्षण पूर्ण करून सुहाना भारतात परतली आहे आणि आता ती आपल्या बॉलिवूड डेब्यूवर लक्ष केंद्रित करुन आहे. लवकरच तिचा  चित्रपट रिलीज होण्याच्या वाटेवर आहे ज्यावर शाहरुख खानच्या चाहत्यांच्या नजरा टिकून आहेत. सुहाना खान पुन्हा एकदा विमानतळावर दिसली. तिची स्टाइल पाहून लोक तिला शाहरुख खानची कॉर्बन कॉपी म्हणू लागले. इतकेच नाही तर काही चाहत्यांनी सुहानावर विचित्र कमेंट्सही केल्या. 

गुरुवारी सुहाना खान (Suhana Khan)  मुंबई विमानतळावर दिसली. यादरम्यान ती कूल आउटफिटमध्ये दिसली. पापाराझींना पाहून तिनं मोठी स्माईल दिली. नेहमी प्रमाणे काही नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं. 

सुहाना खान या व्हिडिओमध्ये मेकअपशिवाय आणि साध्या कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसली. सुहाना खान हुबेहुब तिचे वडील शाहरुख खानसारखी दिसते. काही चाहत्यांनी कमेंटमध्ये याबद्दल लिहिले. एका यूजरने लिहिले की, तो पहिल्या नजरेतच गोंधळून गेला की ती सुहाना आहे की शाहरुख.  दुसऱ्या युजरने लिहिले की, सुहाना शाहरुख खानची कॉर्बन कॉपी आहे.

सुहाना खानचा बॉलिवूड डेब्यू
सुहाना खान  झोया अख्तरच्या 'द आर्चीज'मधून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्यासोबत अनेक स्टारकिड्स दिसणार आहेत. सध्या ती तिच्या चित्रपटात व्यस्त आहे. दुसरीकडे, सुहानाचे वडील शाहरुख त्यांच्या पठाणच्या रिलीज डेटमुळे चर्चेत आहेत. अलीकडेच शाहरुखसोबत संपूर्ण फॅमिली स्पॉट झाला होता.

Web Title: Suhana khan cute video without makeup at airport video fans says shah rukh khan duplicate