विदेशात शूट करताना दिसली सुहाना खान! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 14:56 IST2018-12-11T14:53:43+5:302018-12-11T14:56:41+5:30

सुहानाचे आणखी काही नवे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोत सुहाना शूटींग करताना दिसत आहे. हे फोटो पाहून ते कुण्या प्रोफेशनल शूटचे असावे असे भासते.

suhana khan all set to make his big bollywood debut viral pictures | विदेशात शूट करताना दिसली सुहाना खान! पाहा, फोटो!!

विदेशात शूट करताना दिसली सुहाना खान! पाहा, फोटो!!

ठळक मुद्देमध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉन्च करणार, अशी बातमी होती.   कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इ्च्छा होती. शाहरूखला काहीतरी भव्य हवे होते. आता भव्यदिव्य असे काही हवे असेल तर भन्साळींसारख्या लार्जर दॅन लाईफ दिग्दर्शकाशिवाय

किंगखानची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमध्ये येणार, अशा बातम्या अधूनमधून येतात आणि पुन्हा हवेत विरतात. काही दिवसांपूर्वी सुहाना खानने शाळेत रोमिओ-ज्युलिएट नावाचे नाटक केले होते. या नाटकातील तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. यानंतर तिच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चांना पुन्हा ऊत आला होता. आता सुहानाचे आणखी काही नवे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोत सुहाना शूटींग करताना दिसत आहे. हे फोटो पाहून ते कुण्या प्रोफेशनल शूटचे असावे असे भासते. पण थांबा... सुहानाचे फोटो आॅफिशिअल शूटचे नाहीत. यात ती आपल्या मित्रांसोबत शूटींग एक्सरसाईज करतेय. त्याचेच हे फोटो आहेत.

एका फोटोत सुहानाने  मित्रांसोबत पोझ दिलीय. काही महिन्यांपूर्वी सुहानाने जगप्रसिद्ध ‘वोग’ या फॅशन मॅगझिनसाठी पहिले फोटोशूट केले होते. हे फोटोशूट म्हणजे ग्लॅमवर्ल्डमध्ये सुहानाची एन्ट्री मानली गेली होती.  

मध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉन्च करणार, अशी बातमी होती.   कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इ्च्छा होती. शाहरूखला काहीतरी भव्य हवे होते. आता भव्यदिव्य असे काही हवे असेल तर भन्साळींसारख्या लार्जर दॅन लाईफ दिग्दर्शकाशिवाय बॉलिवूडमध्ये अन्य दुसरा पर्याय नाही. कारण भन्साळी त्यांच्या भव्यदिव्य चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यामुळे सुहानाच्या लॉन्चिंगसाठी शाहरूखने भन्साळींच्या नावाला पसंती दिली, असे म्हटले गेले होते.  स्वत: सुहानाला पारंपरिक लव्हस्टोरीत इंटरेस्ट नाही. आपण काहीतरी वेगळे करावे. आपला डेब्यू काहीतरी वेगळा आणि यादगार व्हावा, अशी तिचीही इच्छा आहे.  आता तिची ही इच्छा भन्साळी पूर्ण करतात की आणखी कुणी, ते पाहूच.

Web Title: suhana khan all set to make his big bollywood debut viral pictures