सुबोध भावेला मिळाला बॉलिवूड चित्रपट! 'मैने प्यार किया' फेम भाग्यश्रीसोबत झळकणार, पाहा ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 05:30 PM2023-10-12T17:30:46+5:302023-10-12T17:32:35+5:30

Sajini Shinde Ka Viral Video Trailer : बॉलिवूड चित्रपटात मराठी कलाकारांंची फौज, सुबोध भावे भाग्यश्रीसोबत झळकणार

subodh bhave to shared screen with bhagyashree in bollywood movie sajini shinde ka viral video | सुबोध भावेला मिळाला बॉलिवूड चित्रपट! 'मैने प्यार किया' फेम भाग्यश्रीसोबत झळकणार, पाहा ट्रेलर

सुबोध भावेला मिळाला बॉलिवूड चित्रपट! 'मैने प्यार किया' फेम भाग्यश्रीसोबत झळकणार, पाहा ट्रेलर

उत्कृष्ट अभिनय आणि विविधांगी भूमिका साकारून सुबोध भावेने मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी सुबोध एक आहे. बालगंधर्व, लोकमान्य : एक युगपुरुष, हर हर महादेव, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, वाळवी अशा अनेक चित्रपटातून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. आता सुबोध बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' या चित्रपटात सुबोध भावे झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. रहस्यकथा असलेल्या या चित्रपटात सुबोध भावे महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. मैने प्यार किया चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या भाग्यश्रीबरोबर सुबोध या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सजिनी शिंदे ही शिक्षिका अचानक गायब झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. बेपत्ता असलेल्या सजिनीचा शोध घेण्याची आणि हे रहस्य उलगडण्याची जबाबदारी महिला पोलीस अधिकारी बेला हिने घेतली आहे. 

या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' या चित्रपटाचा ट्रेलर उत्कंठावर्धक आहे. यात सुबोध भावे आणि भाग्यश्री एकत्र स्क्रीन शेअर करणार असल्यामुळे या चित्रपटासाठी त्यांचे चाहतेही आतुर आहेत. येत्या २७ ऑक्टोबरला 'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' हा चित्रपट मिखिल मुसळे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात राधिका मदन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात तिने सजनी शिंदेची भूमिका साकारली आहे. तर निम्रत कौर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. सुबोध भावेबरोबरच या चित्रपटात बॉलिवूड कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. चिन्मय मांडलेकर, आशुतोष गायकवाड, स्नेहा रायकर हे मराठी कलाकारही झळकले आहेत. 

Web Title: subodh bhave to shared screen with bhagyashree in bollywood movie sajini shinde ka viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.