Subhash Ghai Birthday : माधुरी-सलमान दोघांनाही ‘परदेस’ सिनेमा करायचा होता, पण सुभाष घईंनी नकार दिला; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 11:43 AM2023-01-24T11:43:22+5:302023-01-24T11:44:07+5:30

Subhash Ghai Birthday : ‘परदेस’साठी माधुरीची निवड न करण्यामागे एक खास कारण होतं. सुभाष घईंनी एका मुलाखतीत या कारणाचा खुलासा केला होता.

subhash ghai told why he did not sign salman khan madhuri dixit in pardes | Subhash Ghai Birthday : माधुरी-सलमान दोघांनाही ‘परदेस’ सिनेमा करायचा होता, पण सुभाष घईंनी नकार दिला; कारण...

Subhash Ghai Birthday : माधुरी-सलमान दोघांनाही ‘परदेस’ सिनेमा करायचा होता, पण सुभाष घईंनी नकार दिला; कारण...

googlenewsNext

Subhash Ghai Birthday : ‘हिरो’मधील बासरीची ट्युन, ‘राम लखन’मधील माधुरी दीक्षितचं ‘बडा दुख दिना ओ रामजी’ हे गाणं, सौदागर मधील ‘इमली का बुटा, बेरी का पेड’ हे गाणं किंवा मग परदेसमधील ‘दो दिल मिल रहे है…’ हे गाणं… हे सगळं काही आठवलं की आठवतं ते दिग्दर्शक सुभाष घईंचं नाव. आज सुभाष घईंचा वाढदिवस. ‘परदेस’, ‘कर्मा’, ‘राम लखन’, ‘ताल, यांसारखे अनेक सुपरहिट देणाऱ्या सुभाष घईंचा ‘परदेस’ हा चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय, चित्रपटातली गाणी हे सगळंच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं.

गेल्याच वर्षी या चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाली. चित्रपटातील महिमा चौधरीचा (Mahima Chaudhry ) गोड चेहराही चाहत्यांना भावला. सुभाष घईंनी ‘परदेस’साठी (Pardes) जाणीवपूर्वक महिमाची निवड केली होती. तुम्हाला ठाऊक नसेल पण माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ‘परदेस’ करण्यास उत्सुक होती. पण सुभाष घईंनी माधुरीऐवजी महिमाची निवड केली. सलमान खानही (Salman Khan ) या चित्रपटात काम करण्यास एका पायावर राजी होता. पण सुभाष घईंनी त्यालाही नकार देत शाहरूखची निवड केली.

म्हणून माधुरीला दिला नकार...
‘परदेस’साठी माधुरीची निवड न करण्यामागे एक खास कारण होतं. सुभाष घईंनी एका मुलाखतीत या कारणाचा खुलासा केला होता. माधुरीला ‘परदेस’ची कथा जाम आवडली होती. तिला हा सिनेमा करायचाच होता. टीमही सुद्धा हीच इच्छा होती. पण सुभाष घईंनी माधुरीच्या नावावर फुली मारली आणि महिमाला निवडलं. याचं कारण सांगताना ते म्हणाले होते की, “ माधुरीला माझ्यासोबत परदेस करायचा होता. १९९७ मध्ये माधुरी एक मोठी स्टार झाली होती. पण मला या चित्रपटात माधुरी नको होती. इतक्या मोठ्या स्टार हिरोईनला घेऊन पडद्यावर मी तिला साधी भोळी  दाखवलं असतं तर ती प्रेक्षकांची फसवणूक ठरली असती. ती चालाखी प्रेक्षकांनाही आवडली नसती. परदेसमध्ये मला नवा चेहराच हवा होता आणि मी यावर ठाम होतो. तुम्ही माधुरीला घ्या, आम्ही म्हणाल ते पैसे देऊ, असं मला निर्माते म्हणाले होते. पण मी नवा चेहराच घेणार, तुम्हाला हवे ते पैसे द्या, असं यावर मी त्यांना म्हणालो. मी कधीही कलाकाराला नजरेसमोर ठेवून कोणतीही भूमिका लिहीत नाही. आधी व्यक्तिरेखा आणि कथा लिहिली पाहिजे आणि मग त्यासाठी कलाकाराची निवड केली पाहिजे. त्यामुळे मी कधीही कलाकाराला डोळ्यासमोर ठेवून कोणतेही व्यक्तीरेखा लिहीत नाही.”

अशी झाली शाहरूखची एन्ट्री
“सलमानही या सिनेमासाठी उत्सुक होता. पण शाहरूखने आमच्या कंपनीसोबत तीन सिनेमे करण्याचा करार साईन केला होता. मी शाहरूखला परदेसची स्टोरी ऐकवली आणि त्याने होकार दिला. म्हणून मी शाहरूखला या सिनेमात घेतलं,”असंही त्यांनी मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

१९९७ साली ‘परदेस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अपूर्व अग्निहोत्री, महिमा चौधरी यांबरोबरच शाहरुख खान, अमरीश पुरी, आलोक नाथ, हिमानी शिवपुरी त्यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

Web Title: subhash ghai told why he did not sign salman khan madhuri dixit in pardes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.