अभिनेत्रींच्या आरोपांवर अखेर सुभाष घईंनी सोडलं मौन; म्हणाले, "आजकाल कोणाला भेटणंही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 15:47 IST2025-09-29T15:46:18+5:302025-09-29T15:47:04+5:30
'मी टू'च्या आरोपांवर सुभाष घई नेमकं काय म्हणाले?

अभिनेत्रींच्या आरोपांवर अखेर सुभाष घईंनी सोडलं मौन; म्हणाले, "आजकाल कोणाला भेटणंही..."
दिग्दर्शक सुभाष घई सध्या चर्चेत आहेत. अभिनेत्री नेहल वडोलियाने त्यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. त्यांनी तिला किस करण्याचा प्रयत्न केला होता असं ती एका मुलाखतीत म्हणाली. याआधीही घईंवर अशा प्रकारचे आरोप करण्यात आले होते. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सर्व आरोपांचं खंडन केलं. त्यांची पोस्ट नक्की काय आहे वाचा.
सुभाष घईंनी त्यांच्या बाल्कनीतील गार्डनचा फोटो शेअर करत लिहिले, "जर कोणी नवखा कलाकार तुमच्याकडे मदत मागायला आला तर त्याला मदत करणं ही प्रत्येक सीनियर एक्सपर्टचं कर्तव्यच आहे. त्याला प्रोफेशनमध्ये पुढे जाण्यासाठी योग्य मार्ग दाखवणं हे आमचं काम आहे. मात्र आजकाल अनोळखी लोकांना भेटणं भीतीदायकच झालं आहे. स्वत:चं प्रमोशन करण्यासाठी ते सोशल मीडियावर चुकीची वक्तव्ये करतात. जसं की आजकाल काही वक्तव्ये माझ्या ऐकिवात आली आहेत, देव त्यांचं भलं करो. सम्माजनक करिअर घडवण्यासाठी एकमेकांप्रति आदर असणं खूप गरजेचं आहे."
यापूर्वी सुभाष घईंवर तीन अभिनेत्रींनीही 'मी टू'चे आरोप लावले होते. इजरायली मॉडेल रीना गोलाने तिच्या पुस्तकात आरोप केला होता. तसंच २०१८ साली मी टू मोहिमेवेळी एका अज्ञात महिलेने घईंवर आरोप लावले होते. लेखिका कुकरेजा यांनी तिचे स्क्रीनशॉट्स शेअर केले होते. तसंच मॉडेल केट शर्माने सुभाष घईंविरोधात विनयभंगाची केस केली होती.