STUNNING : अंकिता लोखंडेने शेअर केले हॉट फोटोशूट..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 15:17 IST2017-01-31T09:45:21+5:302017-01-31T15:17:08+5:30

‘पवित्र रिश्ता’ या टीव्ही शोपासून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे ही आता पुन्हा एकदा तिच्या नुकत्याच झालेल्या हॉट फोटोशूटमुळे ...

STUNNING: Hot photoshoot shared by Ankita Lokhande. | STUNNING : अंकिता लोखंडेने शेअर केले हॉट फोटोशूट..

STUNNING : अंकिता लोखंडेने शेअर केले हॉट फोटोशूट..

वित्र रिश्ता’ या टीव्ही शोपासून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे ही आता पुन्हा एकदा तिच्या नुकत्याच झालेल्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आलीय. एक्स-बॉयफे्रें डच्या विरहात तिने तिचे टीव्ही शोज सोडून दिले काय? असा काहींचा गैरसमज झाला होता. मात्र तसे काहीही नसून तिने टीव्ही शोजपासून आता थोडासा ब्रेक घेतला असल्याचे कळतेय. तिने तिचे फोटोशूट सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या फोटोंमध्ये स्टनिंग लुकमध्ये दिसतेय. 

ALSO READ : अंकिता नसणार भन्साळींच्या ‘पद्मावती’ त?
                                        
 
ALSO READ : क्रिती सॅननमुळेच झाले होते का सुशांत सिंग रजपूत आणि अंकिता लोखंडेचे ब्रेकअप?

‘पवित्र रिश्ता’ पासून अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असलेली टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे ही संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटातून डेब्यू करणार असल्याची मध्यंतरी जोरदार चर्चा होती. पण, त्याबद्दल कुठलेही अपडेट्स नसल्याचे कळतेय. सुशांतसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर अंकिताने स्वत:चा मेकओव्हर करून घेतला. इन्स्टाग्रामवरील तिच्या फोटोवरून ते लक्षात आले. तिने नुकतेच केलेल्या फोटोशूटला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसंती मिळतेय. यात काही क्लोज अप्स आणि ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट स्टिल्स फोटो आहेत.

                                      

                                     

अंकितासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ आणि ‘राब्ता’ या दोन चित्रपटांमध्ये व्यस्त झाला. त्यामुळे अभिनेत्री क्रिती सॅनन याच्यासोबत त्याची जवळीक झाल्याच्या बऱ्याच बातम्या धडकल्या. मध्यंतरी तर अंकितानंतर तो क्रितीच्या प्रेमात पडला की काय? अशी शंका त्याच्या चाहत्यांना निर्माण झाली. मात्र, तसे काहीही झालेले नसून त्या केवळ अफवा असल्याचे तो सांगतो. अंकितासोबतचे त्याचे नाते अद्यापही तसेच कायम आहे का? यावर प्रश्नचिन्हच आहे.

Web Title: STUNNING: Hot photoshoot shared by Ankita Lokhande.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.