‘स्टुडेंट आॅफ दी ईयर2’मध्ये टायगरसोबत त्याची प्रेयसीही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2016 16:46 IST2016-08-28T11:16:11+5:302016-08-28T16:46:11+5:30
‘स्टुडेंट आॅफ दी ईयर’च्या सीक्वलमध्ये टायगर श्रॉफची वर्णी लागलीयं, हे तुम्हाला ठाऊक आहेच. आता टायगरच्या अपोझिट कोण असणार, याची ...

‘स्टुडेंट आॅफ दी ईयर2’मध्ये टायगरसोबत त्याची प्रेयसीही?
‘ ्टुडेंट आॅफ दी ईयर’च्या सीक्वलमध्ये टायगर श्रॉफची वर्णी लागलीयं, हे तुम्हाला ठाऊक आहेच. आता टायगरच्या अपोझिट कोण असणार, याची उत्सुकता तुम्हाला असणार. तेव्हा आम्ही तुमच्यासाठी खास बातमी घेऊन आलो आहोत. होय, ‘स्टुडेंट आॅफ दी ईयर’मध्ये तुम्ही आलिया, सिद्धार्थ व वरूण यांचा प्रेमत्रिकोण पाहिला. आमच्या माहितीनुसार, ‘स्टुडेंट आॅफ दी ईयर2’मध्येही असाच प्रेमत्रिकोण पाहायला मिळणार आहे. मात्र यावेळी एक हिरोईन, दोन हिरो असा नाही तर एक हिरो, दोन हिरोईन असा प्रेमत्रिकोण पाहायला मिळणार आहे. ‘स्टुडेंट आॅफ दी ईयर2’मध्ये टायगरच्या अपोझिट सैफ अली खानची मुलीगी सारा अली खान आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर यांच्या नावांची चर्चा आहे. पण ताज्या बातमीनुसार, टायगरची कथित प्रेयसी दिशा पाटणी हिच्या नावाचाही विचार सुरु आहे. म्हणजे दिशाचे नाव पक्के झाल्यास सारा किंवा जान्हवी या दोघींपैकी एकीचा पत्ता कट होणार. आता कुणाचा पत्ता कट होतो आणि कुणाचा नाही, ते आपण बघूच!