‘स्टुडंट आॅफ द ईअर2’साठी करावी लागणार उन्हाळ्यापर्यंत प्रतीक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 20:07 IST2018-07-30T20:06:25+5:302018-07-30T20:07:01+5:30

‘स्टुडंट आॅफ द ईअर2’ या चित्रपटाकडे सिनेप्रेमींचे लक्ष लागले आहे. करण जोहरचा हा बहुप्रतिक्षीत चित्रपट यावर्षी 23नोव्हेंबरला रिलीज होणे अपेक्षित होते. पण आता ही रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली आहे.

student of the year 2 pushed to the summer will now release on 10 may 2019 | ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’साठी करावी लागणार उन्हाळ्यापर्यंत प्रतीक्षा!

‘स्टुडंट आॅफ द ईअर2’साठी करावी लागणार उन्हाळ्यापर्यंत प्रतीक्षा!

‘स्टुडंट आॅफ द ईअर2’ या चित्रपटाकडे सिनेप्रेमींचे लक्ष लागले आहे. करण जोहरचा हा बहुप्रतिक्षीत चित्रपट यावर्षी 23नोव्हेंबरला रिलीज होणे अपेक्षित होते. पण आता ही रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली आहे. होय, आता हा चित्रपट पुढील वर्षी उन्हाळ्यात प्रदर्शित होईल. करणने स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे.



 मात्र रिलीज डेट लांबणीवर टाकण्यामागचे कारण त्याने स्पष्ट केले नाही. अर्थात त्याने सांगितले नसले तरी यामागचे कारण आपण समजू शकतोच. व्यावसायिक लाभाच्या हेतूने आखलेली समीकरणे आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचा हंगाम हे करणने बरोबर हेरले. आता याचा चित्रपटाला किती फायदा होतो, ते बघूच.
स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत आहेत, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया. २०१२ मध्ये ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ रिलीज झाला होता. तरूणाईने हा चित्रपट चांगलाच डोक्यावर घेतला होता. हा चित्रपट स्वत: करणने दिग्दर्शित केला होता. पण ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’ पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित करतोय. पुनीतने याआधी ‘आय हेट लव्ह स्टोरी’ आणि ‘गोरी तेरे प्यार में’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

 तारा सुतारिया अभिनेत्री, गायिका आणि डान्सर आहे. तिने क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची यूके येथे ट्रेनिंग केली आहे. त्याचबरोबर ‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यासारख्या चित्रपटांमध्ये तिने डबिंगही केली आहे. ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून डिज्नीमध्येही काम केले आहे. 
तर चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेदेखील या चित्रपटाच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आहे. चित्रपटात अनन्याची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. अनन्याची गणना बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिश आणि पॉप्युलर स्टार मुलींमध्ये केली जाते. अनन्याला नेहमीच शाहरुख खानची मुलगी सुहाना खानसोबत बघण्यात आले आहे. अनन्या पांडे, सुहाना खान आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूर या तिघी बेस्ट फ्रेंड्स आहेत. त्या नेहमीच डिनर पार्टी, मुव्ही डेटला जाताना एकत्र बघावयास मिळतात. 

Web Title: student of the year 2 pushed to the summer will now release on 10 may 2019