​१२ वीच्या परिक्षेपूर्वीचं अनन्याला मिळाला ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’! डॅड चंकी पांडेला माहिती न करताचं दिले होते आॅडिशन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 13:52 IST2018-04-12T08:22:21+5:302018-04-12T13:52:21+5:30

अभिनेता चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतेय, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. होय, ...

Student of the Year 2 got a Prize before the 12th test! Dad Chunky Pandey was given information without informing. | ​१२ वीच्या परिक्षेपूर्वीचं अनन्याला मिळाला ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’! डॅड चंकी पांडेला माहिती न करताचं दिले होते आॅडिशन!!

​१२ वीच्या परिक्षेपूर्वीचं अनन्याला मिळाला ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’! डॅड चंकी पांडेला माहिती न करताचं दिले होते आॅडिशन!!

िनेता चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतेय, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. होय, ‘स्टुडंट आॅफ द ईयर’चा सीक्वल ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’मधून अनन्या बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवतेय. धर्मा प्रॉडक्शन अनन्याला लॉन्च करणार म्हटल्यावर साहजिकच चंकी जाम आनंदात आहे. याच आनंदात अनन्याचा हा पहिला प्रोजेक्ट आणि तिच्या आॅडिशनबद्दलची काही माहिती चंकीने शेअर केलीय. 
‘स्टुडंट आॅफ द ईयर2’ अनन्याला कसा मिळाला, असा प्रश्न अलीकडे एका मुलाखतीत चंकीला केला गेला. यावर चंकीने यामागची अख्खी स्टोरीचं सगळ्यांशी शेअर केली. ‘अनन्याने १२ वी पूर्ण करण्याच्या आधीच या चित्रपटासाठी आॅडिशन दिले होते. खरे तर मला तिच्या या आॅडिशनबद्दल माहितही नव्हते. ती अभ्यासात हुशार आहे. तिला युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत प्रवेशही मिळाला होता. पण त्याचआधी तिला हा चित्रपट मिळाला. त्यामुळे आम्ही तिचे अ‍ॅडमिशन एक वर्षे पुढे ढकलले,’असे चंकीने सांगितले. ‘अनन्या दहावीत होती, तेव्हाच अभिनय करणार, हे तिने निश्चित केले होते. पण ती अभ्यासात हुशार असल्याने मी तिला पुढील शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला होता. १२ वीची परीक्षा सुरू होण्याच्या दोन दिवसाआधी ती ‘स्टुडंट आॅफ द ईयर’च्या सीक्वलसाठी सिलेक्ट झाल्याचे आम्हला कळले. अनन्याला धर्मा प्रॉडक्शन लॉन्च करतेय, यापेक्षा चांगले काय असू शकते. कदाचित अनन्या धर्मा प्रॉडक्शनसाठीचं जन्मली आहे,’असेही चंकी म्हणाला.

ALSO READ : टायगर श्रॉफसोबत रोमान्स करणार चंकी पांडेची मुलगी; ‘Student Of The Year-2’चे दोन पोस्टर रिलीज!

तूर्तास ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’चे शूटींग सुरु झाले आहे. पुनीत मल्होत्रा हा चित्रपट दिग्दर्शित करतोय. टायगर श्रॉफ या चित्रपटात लीड रोलमध्ये आहे. त्याच्यासोबत अनन्या आणि तारा सुतारिया या दोघी आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहेत. हा चित्रपट निर्माता व दिग्दर्शक करण जोहरच्या २०१२ मध्ये आलेल्या ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. या चित्रपटात वरुण धवन, आलिया भट्ट  आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी काम केले होते. या तिघांनी या चित्रपटाच्या माध्यमातूनच आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. आज हे तिन्ही स्टार्स इंडस्ट्रीमध्ये कमालीचे यशस्वी आहेत.

Web Title: Student of the Year 2 got a Prize before the 12th test! Dad Chunky Pandey was given information without informing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.