सहा गर्भवती महिलांची कथा ‘वंडर विमेन’ सिनेमात, रिलीज झाला ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 05:39 PM2022-11-03T17:39:44+5:302022-11-03T17:40:25+5:30

Wonder Women : ‘वंडर विमेन’ सिनेमा १८ नोव्‍हेंबरला भेटीला येणार आहे.

Story of six pregnant women in 'Wonder Women' movie, trailer released | सहा गर्भवती महिलांची कथा ‘वंडर विमेन’ सिनेमात, रिलीज झाला ट्रेलर

सहा गर्भवती महिलांची कथा ‘वंडर विमेन’ सिनेमात, रिलीज झाला ट्रेलर

googlenewsNext

काही नाती असतात, तर काही खास नाती असतात. आपण मानवांना एकाच मताची माणसे शोधण्‍यास अवघड जाते किंवा आपण आपल्‍या सभोवतालच्‍या विश्‍वामध्‍ये वावरण्‍यास सुरूवात केल्‍यानंतर ‘आपला समाज’ म्‍हणण्‍यास सुरूवात करतो. ही नाती विश्‍वसनीय, वैवाहिक, रोमँटिक व आदरणीय अशा विविध प्रकारची असू शकतात. पण या सर्वांमध्‍ये एक नाते गोड, प्रेमळ व उत्‍साही असते, ते म्‍हणजे महिलांचे; महिला एकमेकांना परिचित अनुभव, भिती व आशा यामध्‍ये नेव्हिगेट करण्‍यास मदत करण्‍यासाठी एकत्र येतात तेव्‍हा त्‍यांचा असा समाज निर्माण होतो, जो संकटात त्‍यांच्‍या पाठीशी उभा राहतो, त्‍यांना अधिक प्रबळ करतो. हा प्रवास व त्‍यांच्‍या धैर्याला प्रशंसित करत सोनी लिव्‍ह जीवनाचा सार दाखवणारा चित्रपट ‘वंडर विमेन’ ( Wonder Women) सादर करत आहे. अंजली मेनन यांचे लेखन व दिग्‍दर्शन असलेला हा चित्रपट व्‍यासपीठावर १८ नोव्‍हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

हा चित्रपट सहा गर्भवती महिलांची कथा सादर करतो, ज्या गर्भधारणा व बाळंतपणाबाबत विश्वास, गोंधळ आणि प्रश्नांसह प्रसूतीपूर्व कक्षामध्‍ये येतात. या सर्व गोष्‍टींचा उलगडा करण्‍याच्‍या प्रयत्‍नात त्यांना त्यांची ओळख आणि त्यांच्या खोलवर रुजलेल्या समस्यांची उत्तरे सापडतात. हा चित्रपट व संकल्‍पनेबाबत सांगतात अंजली मेनन म्‍हणाल्‍या, ‘’मला अनुभवातून समजले आहे की भगिनी आपल्याला वैयक्तिक आणि सामूहिकरित्या सक्षम करू शकतात. ‘वंडर विमेन’सह माझी हे प्रेमळ बंध विविध पार्श्वभूमीतील अनेक पात्रांद्वारे आणि जीवनाला सामोरे जाण्याच्या त्यांच्या मजेशीर व आनंददायी पद्धतीने सादर करण्‍याची इच्‍छा होती. ही पात्रे सामान्य महिला आहेत, जी देशभरातील सर्व वयोगटातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतील. ही कथा त्यांच्या जीवनाला आणि गर्भधारणा व त्यांची नवीन मैत्री त्यांना पुढे जाण्‍यास देणाऱ्या स्‍फूर्तीला सादर करते. हा पूर्णत: हृदयस्‍पर्शी चित्रपट आहे आणि मी या पात्रांसह प्रेक्षकांचा प्रवास पाहण्‍यासाठी उत्‍सुक आहे. सोनी लिव्‍ह नवीन कन्‍टेन्‍ट व अभूतपूर्व संकल्‍पना सादर करत आले आहे, ज्‍यामुळे मी सोनी लिव्‍हवर हा चित्रपट प्रदर्शित होण्‍याबात खूपच उत्‍सुक आहे.’’

आरएसव्‍हीपी फ्लाईंग युनिकॉर्न एंटरटेन्‍मेंटसह लिटल फिल्‍म्‍स प्रॉडक्‍शन्‍स निर्मित या चित्रपटामध्‍ये नित्‍या मेनेन, पार्वती थिरूवोथू, अमृता सुभाष, नदिया मोयडू, पद्मप्रिया जनकिरमन, सायानोरा फिलिप, अर्चना पद्मिनी प्रमुख भूमिकेत आहेत. या महिलांच्‍या कथेचे इंग्रजीमध्‍ये चित्रीकरण करण्‍यात आले आहे, ज्‍यामध्‍ये हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगु, मल्‍याळम व कन्‍नड या भाषा देखील आहेत. 

Web Title: Story of six pregnant women in 'Wonder Women' movie, trailer released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.