‘कहानी २’ ची थ्रिलिंग राईड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 18:57 IST2016-10-25T18:57:13+5:302016-10-25T18:57:13+5:30

चित्रपटातील खरा हीरो हे त्याचे कथानक आहे, हे जाणवल्याशिवाय राहत नाही. थोडक्यात काय तर ‘कहानी २’ म्हणजे एक थ्रिलिंग राईड आहे.

'Story 2' Thrilling Ride! | ‘कहानी २’ ची थ्रिलिंग राईड!

‘कहानी २’ ची थ्रिलिंग राईड!

१२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कहानी’ चित्रपट आठवतोय ना? ज्यात विद्या बालन गरोदर महिलेच्या भूमिकेत होती. संपूर्ण चित्रपटात ती तिच्या पतीचा शोध घेत असते. कथानकाच्या शेवटी कळते की, ती गरोदर नसतेच. विद्याचा अप्रतिम अभिनय, सुजॉय घोष यांचे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे दिग्दर्शन, चित्रीकरण या संपूर्ण वैशिष्ट्यांसह चित्रपटाची उत्तम रचना करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा तसाच थरार आणि रहस्य घेऊन येतोय ‘कहानी २’.

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलर सुरू होताच विद्या बालनला एक फोन येतो. तिची मुलगी मिम्मीचे अपहरण केल्याचे तिला कळते. घाईगडबडीत जाणाऱ्या  विद्याचा कारला धडकून अपघात होतो आणि ती कोमामध्ये जाते. नंतर उलगडा होतो की, ती लहान मुलांचे किडनॅपिंग करून त्यांचा खुन करणारी दुर्गा रानी सिंग असते आणि कथानक पुढे सरकते. आता चित्रपटाच्या शेवटी कोणकोणत्या घटनांची उकल होते हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. 

अर्जुन रामपाल यात पोलिसाच्या भूमिकेत दिसतोय. मात्र, चित्रपटातील खरा हीरो हे त्याचे कथानक आहे, हे जाणवल्याशिवाय राहत नाही. थोडक्यात काय तर ‘कहानी २’ म्हणजे एक थ्रिलिंग राईड आहे.

">http://

Web Title: 'Story 2' Thrilling Ride!