​पहिला पाऊस एन्जॉय करताना दिसली स्टार डॉटर सुहाना खान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2017 14:51 IST2017-06-04T09:19:27+5:302017-06-04T14:51:53+5:30

काल शनिवारी संध्याकाळी मुंबईत रिमझिम पाऊस बरसला. या पावसानंतर मुंबईच्या वेगवेगळ्या भागात ट्राफिक जाम झाली होती. असे असूनही अनेक ...

Star dhuber suhana Khan appeared first while envious! | ​पहिला पाऊस एन्जॉय करताना दिसली स्टार डॉटर सुहाना खान!

​पहिला पाऊस एन्जॉय करताना दिसली स्टार डॉटर सुहाना खान!

ल शनिवारी संध्याकाळी मुंबईत रिमझिम पाऊस बरसला. या पावसानंतर मुंबईच्या वेगवेगळ्या भागात ट्राफिक जाम झाली होती. असे असूनही अनेक लोक वीकेंड एन्जॉय करायला घराबाहेर पडलेच. पावसाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्यांमध्ये शाहरूख खानची स्टार डॉटर सुहाना खान हिचाही समावेश होता. सुहाना तिच्या काही मित्रांसोबत पीव्हीआर जुहूच्या जवळ स्पॉट झाली. यावेळी सुहानाने पावसाचा मनमुराद आनंद घेतला. फोटोंमधील तिचा हॅपी मूड पाहून तुम्हाला याचा अंदाज येईल. सुहाना तिच्या कारच्या फ्रंट सीटवर बसली आहे. तर मागच्या सीटवर तिच्या काही मैत्रिणी आहेत. सगळ्याजणी कारमध्ये बसल्या बसून धम्माल मस्ती करत आहेत. या फोटोंमध्ये सुहाना कमालीची सुंदर दिसतेय.





सुहाना सध्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतेय. डान्सिंग आणि स्पोर्ट तिचे आवडीचे विषय. सुहानाने एक डान्सर म्हणून नाव कमवावे, असे शाहरूखला वाटतेय. अर्थात सुहानाने अभिनय क्षेत्रात यावे, यालाही शाहरूखची ना नाहीय. तसेही सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा जोरात सुरु झाल्या आहेत. अलीकडे शाहरूखची लाडकी लेक सुहाना एक उत्तम अभिनेत्री बनणार, मोठे नाव कमावणार, असे भाकीत ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी  यांनी वर्तवले होते.



‘माझे शब्द लक्षात ठेव. सुहाना खान ही पुढे जाऊन एक चांगली अभिनेत्री होणार. मी तिचे काही व्हिडिओ बघितले आहेत. तिने खूप छान अभिनय केलाय,’ असे टिष्ट्वट शबाना यांनी  शाहरूखला उद्देशून केले आहे.  शबाना यांचे हे शब्द ऐकून शाहरूखचा ऊर भरून आला होता.  तुम्ही खरंच खूप चांगल्या आहात. तुमच्या या विश्वासानंतर नक्कीच छोटीला प्रेरणा मिळेल, अशा शब्दांत त्याने शबानांचे  आभार मानले होते.

Web Title: Star dhuber suhana Khan appeared first while envious!