बहीणसोबत काळ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये उभी असलेली ही क्युट मुलगी आज आहे बॉलिवूडची सुपरस्टार; ओळखा पाहू कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 08:00 AM2023-04-30T08:00:00+5:302023-04-30T08:00:02+5:30

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री तिच्या बहिणीसोबत दिसत आहे. तिची बहीणसुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

standing with her sister in a black frock this cute girl is ruling bollywood today find out who the actress is | बहीणसोबत काळ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये उभी असलेली ही क्युट मुलगी आज आहे बॉलिवूडची सुपरस्टार; ओळखा पाहू कोण आहे ती?

बहीणसोबत काळ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये उभी असलेली ही क्युट मुलगी आज आहे बॉलिवूडची सुपरस्टार; ओळखा पाहू कोण आहे ती?

googlenewsNext

बॉलिवूड सेलिब्रिटीं(Bollywood Celebs) च्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. त्याचे आवडते कलाकार बालपणी कसे दिसायचे किंवा ते कुठून शिकले, कुठे राहत होता. बॉलीवूडप्रेमींना नेहमीच अशा सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. सध्या एका अशाच बॉलिवूड सेलिब्रेटीचा बहीणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पण लोकांना तिला ओळखणं कठीण जातेय.
 
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री तिच्या बहिणीसोबत दिसत आहे. फोटोमध्ये दोन लहान मुली दिसत आहेत, ज्यांच्या गळ्यात माळ आहे. फोटोमध्ये दिसणार्‍या दोन्ही मुली त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ब्लॅक फ्रॉकमध्ये बहीणसोबत दिसणारी ही अभिनेत्री नॅशनल अवॉर्डविनिंग अभिनेत्री आहे.  

काळ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये दिसणार्‍या या मुलीला  फोटो पाहून ओळखलंत का? फोटोत दिसणारी या दोन बहिणी दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून फराह नाज (Farah Naaz) आणि तब्बू (Tabu)आहेत. होय, काळ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये दिसणारी मुलगी तब्बू आहे. तब्बू ही अशीच एक बॉलिवूडमधील अभिनेत्री हे जिचे फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. तब्बू आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर तब्बू लवकरच एकता कपूरच्या 'द क्रू' हा सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि करिना कपूर (Kareena Kapoor) अशा आघाडीच्या अभिनेत्रींना आहेत. 'द क्र्यू' सिनेमाच्या चित्रीकरणाला मागच्याच महिन्यात सुरुवात झाली. यामध्ये दलजीत दोसांझही (Diljit Dosanjh) महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही एक कॉमेडी फिल्म असून राजेश कृष्णनन यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. एकता कपूर म्हणाली, 'द क्रू प्रेक्षकांचं मनोरंजन करेल आणि सोबतच प्रोत्साहनही देईल. सिनेमाची जादू टीमवर्कमुळे घडते. मी या फिल्मसाठी खूपच उत्सुक आहे.'

Web Title: standing with her sister in a black frock this cute girl is ruling bollywood today find out who the actress is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tabuतब्बू