ओडिशात श्रेया घोषालच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी; महिला बेशुद्ध, एक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 11:14 IST2025-11-14T11:12:00+5:302025-11-14T11:14:04+5:30
ओडिशात झालेल्या श्रेया घोषालच्या कॉन्सर्टमध्ये धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

ओडिशात श्रेया घोषालच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी; महिला बेशुद्ध, एक जण जखमी
मनोरंजन विश्वातील लोकप्रिय गायिका श्रेया घोषालच्या कॉन्सर्टमधून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. श्रेयाच्या ओडिशातील कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रिपोर्टनुसार, श्रेयाची कॉन्सर्ट पाहण्यासाठी मोठ्या संख्येत लोक उपस्थित होते. त्यावेळी इतकी गर्दी वाढली लोकांमध्ये धक्काबुक्की झाली. यात अनेक जण गुदमरले तर काही महिला बेशुद्ध झाल्याची बातमी समोर येत आहे.
ओडिशा येथील कटक येथे ऐतिहासिन बालीयात्रा मैदानात बॉलिवूड गायिका श्रेया घोषालचा कॉन्सर्ट होता. यावेळी प्रत्येकजण रंगमंचाच्या जवळ उभं राहण्यासाठी प्रयत्न करत होता. याशिवाय जे आधीच रंगमंचाच्या जवळ उभे होते ते जागा सोडायला तयार नव्हते. त्यामुळे लोकांची एकमेकांसोबत धक्काबुक्की झाली. यात महिला बेशुद्ध झाल्या तर काहीजण जखमी झाले. बेशुद्ध आणि जखमी झालेल्या लोकांना त्वरीत नजीकच्या हॉस्पिटलमध्ये प्रथमोपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस आणि शोच्या कर्मचाऱ्यांनी जास्त लोकांना तैनात केलं. याशिवाय लाठीचार्ज करुन गर्दीला नियंत्रणात आणण्यात आलं.
Stampede-like situation erupts at Baliyatra’s closing day Shreya Ghosal's music event; crowd surge leaves at least two injured. #ShreyaGhoshal#BaliJatra#Cuttack#Odisha#MusicalNightpic.twitter.com/DtJsqOpLz6
— sambit kumar 🇮🇳 (@SambitRout18) November 13, 2025
या परिस्थितीत सुदैवाने कोणालाही गंभीर जखम झाली नाही. ५ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान बालीयात्रा सांस्कृतिक कार्यक्रम ओडिशात घडतो. त्यावेळी श्रेया घोषालच्या खास कॉन्सर्टचंही आयोजन करण्यात आलं होतं. या परिस्थितीमुळे श्रेयाची कॉन्सर्ट काहीवेळ थांबवण्यात आली होती. परंतु परिस्थिती नियंत्रणात आल्यावर श्रेयाची कॉन्सर्ट पुन्हा सुरु करण्यात आली. लोकांनीही पुढे शिस्तीचं पालन केल्याने कॉन्सर्ट व्यवस्थित पार पाडली.