'वाराणसी'मध्ये दिसणार रामायणाची भव्य झलक! राजामौलींनी महेश बाबूच्या भूमिकेबाबत दिलं अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 17:57 IST2026-02-09T17:55:32+5:302026-02-09T17:57:32+5:30

एस.एस. राजामौली सध्या त्यांच्या आगामी 'वाराणसी' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.

Ss Rajamouli Shoots Epic Ramayana Scene For Mahesh Babu; Director Says “i Was Walking On Air Seeing Him As Rama” | 'वाराणसी'मध्ये दिसणार रामायणाची भव्य झलक! राजामौलींनी महेश बाबूच्या भूमिकेबाबत दिलं अपडेट

'वाराणसी'मध्ये दिसणार रामायणाची भव्य झलक! राजामौलींनी महेश बाबूच्या भूमिकेबाबत दिलं अपडेट

'बाहुबली' आणि 'RRR' सारखे जागतिक स्तरावर गाजलेले चित्रपट देणारे दिग्गज दिग्दर्शक एस.एस. राजामौली सध्या त्यांच्या आगामी 'वाराणसी' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.  अशातच आता या चित्रपटाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. 'वाराणसी'मध्ये रामायणाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग दाखवण्यात येणार असल्याचं खुद्द एस.एस. राजामौली यांनी सांगितलं.

अमेरिकन वेबसाइट 'द रॅप'शी बोलताना राजामौली यांनी सांगितले की, 'वाराणसी'मध्ये रामायणातील काही अंश पाहायला मिळतील. हा संपूर्ण सीक्वेन्स सुमारे २५ मिनिटांचा असून तो चित्रपटात एकदाच दिसेल. मात्र, हा सीन शूट करण्यासाठी टीमला तब्बल ६० दिवस घाम गाळावा लागला. राजामौली म्हणाले, "या सेगमेंटमधील प्रत्येक भागासाठी वेगळी तांत्रिक आणि सर्जनशील आव्हाने होती. हे शुटिंग करणे म्हणजे एका संपूर्ण चित्रपटाची निर्मिती करण्यासारखेच होते".

या चित्रपटात साऊथ सुपरस्टार महेश बाबू मुख्य भूमिकेत आहे. रामायणाच्या भागात तो भगवान श्रीरामाच्या रूपात दिसणार आहे. राजामौलींनी सांगितले की, "जेव्हा मी महेश बाबूला रामाच्या भूमिकेत पाहिले, तेव्हा माझ्या अंगावर काटा आला". 'वाराणसी'मध्ये महेश बाबू 'रुद्र' नावाच्या एका ग्लोबट्रॉटरची (जगभ्रमंती करणारा) भूमिका साकारत आहे, जो वेगवेगळ्या कालखंडातून प्रवास करताना दिसेल.

अभिनेत्री प्रियंका चोप्रा या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर भारतीय चित्रपटसृष्टीत परतत आहे. तसेच, मल्याळम सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन या चित्रपटात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या हैदराबादमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण जोरात सुरू असून जागतिक स्तरावर त्याचे प्रमोशनही सुरू झाले आहे.

Web Title : राजामौली की 'वाराणसी' में रामायण की झलक; महेश बाबू की भूमिका उजागर।

Web Summary : राजामौली की 'वाराणसी' में 25 मिनट का रामायण सीक्वेंस होगा, जिसे 60 दिनों में फिल्माया गया। महेश बाबू एक ग्लोबट्रॉटिंग किरदार निभा रहे हैं, जिसमें भगवान राम के रूप में उनकी झलक ने राजामौली को प्रभावित किया। प्रियंका चोपड़ा भारतीय सिनेमा में वापसी कर रही हैं, और पृथ्वीराज सुकुमारन मुख्य खलनायक की भूमिका निभा रहे हैं। हैदराबाद में फिल्मांकन जारी है।

Web Title : Rajamouli's 'Varanasi' to showcase Ramayana; Mahesh Babu's role revealed.

Web Summary : Rajamouli's 'Varanasi' will feature a 25-minute Ramayana sequence, filmed over 60 days. Mahesh Babu plays a globetrotting character, with a glimpse as Lord Rama leaving Rajamouli impressed. Priyanka Chopra returns to Indian cinema, and Prithviraj Sukumaran plays the main villain. Filming is underway in Hyderabad.