श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरने खरचं केली का कॉस्मेटिक सर्जरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2017 13:31 IST2017-07-02T08:01:47+5:302017-07-02T13:31:47+5:30

श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर एक पॉप्युलर स्टार किड आहे, यात कुठलेही दुमत नाही. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वीच जान्हवी स्टार ...

Sridevi's Lake Jahnavi Kapoor did the fact that cosmetic surgery? | श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरने खरचं केली का कॉस्मेटिक सर्जरी?

श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरने खरचं केली का कॉस्मेटिक सर्जरी?

रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर एक पॉप्युलर स्टार किड आहे, यात कुठलेही दुमत नाही. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वीच जान्हवी स्टार झाली आहे. जान्हवीला साधी शिंक आली तरी, ती सोशल मीडियावर ट्रेंड करायला लागते. मित्रासोबतचे आऊटींग असो, मम्मासोबतचा ग्लॅमरस लूक असो किंवा बॉलिवूडची पार्टी असो, जान्हवी जिथे दिसेल, जिथे जाईल, त्याची अलीकडे बातमी व्हायला लागली आहे. गेल्या ब-याच दिवसांपासून जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा सुरु आहे.  पण त्याशिवायही एका कारणामुळे जान्हवी सध्या चर्चेत आहे. होय, ते कारण म्हणजे नाकाची सर्जरी. जान्हवीने नाकाची सर्जरी केली, अशी खबर आहे. ताज्या फोटोत जान्हवीचे नाक बरेच स्लिम दिसतेय. अर्थात जान्हवीने खरोखरीच नोस सर्जरी केली वा नाही, याबाबत आम्ही दाव्यानिशी सांगू शकत नाही. पण तिचे आधीचे आणि आत्ताचे फोटो बघता, या बातमीवर विश्वास ठेवणे फार कठीण वाटत नाही. 





अलीकडे जान्हवी कपूर आणि  शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर  हे दोघेही शेनली वुडलीच्या ‘फॉल्ट इन अवर स्टार’ या हॉलिवूड चित्रपटाच्या रिमेकमध्ये एकत्र दिसू शकतात, अशी बातमी होती. शशांक खैतान हा या चित्रपटाचा दिग्दर्शक असल्याचेही समजले होते. अर्थात या बातमीत किती सत्य आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. कारण तूर्तास तरी याबद्दल काहीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या हॉलिवूडपटाच्या बॉलिवूड रिमेकसाठी अनेक बॉलिवूड जोड्यांची नावे चर्चेत होती. सर्वप्रथम यात दीपिका पादुकोण व सुशांत सिंह राजपूत यांची वर्णी लागणार, अशी बातमी होती. यानंतर आलिया भट्ट आणि आदित्य राय कपूर यां दोघांचे नाव चर्चेत आले होते. पण  कदाचित मेकर्सला यासाठी एक फ्रेश जोडी हवी आहे. त्यामुळे मेकर्सनी जान्हवी व इशानच्या नावाला पसंती दिल्याचे या बातमीत म्हटले होते.  

Web Title: Sridevi's Lake Jahnavi Kapoor did the fact that cosmetic surgery?