​तीन महिने पती बोनी कपूरशी बोललीच नाही श्रीदेवी! पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2017 12:25 IST2017-06-05T06:55:52+5:302017-06-05T12:25:52+5:30

सन २०१३मध्ये ‘इंग्लिश- विंग्लिश’ आला. या चित्रपटातून श्रीदेवीने दीर्घकाळानंतर बॉलिवूडमध्ये वापसी केली. आता श्रीदेवी पुन्हा एकदा सज्ज झालीय. होय, ...

Sridevi has not spoken to Bonnie Kapoor for three months! But why? | ​तीन महिने पती बोनी कपूरशी बोललीच नाही श्रीदेवी! पण का?

​तीन महिने पती बोनी कपूरशी बोललीच नाही श्रीदेवी! पण का?

२०१३मध्ये ‘इंग्लिश- विंग्लिश’ आला. या चित्रपटातून श्रीदेवीने दीर्घकाळानंतर बॉलिवूडमध्ये वापसी केली. आता श्रीदेवी पुन्हा एकदा सज्ज झालीय. होय, श्रीदेवीचा ‘मॉम’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. श्रीदेवी आपल्या कामाप्रती प्रचंड समर्पित आहे. हातचे काम संपत नाही, तोपर्यंत इतर गोष्टी करणे तिला आवडत नाहीत. आता ‘मॉम’ या चित्रपटाचेच घ्या. या चित्रपटावेळी श्रीदेवी इतकी प्रोफेशनल झाली होती की, शूटींगच्या तीन महिन्याच्या काळात केवळ काम आणि काम हेच तिच्या डोक्यात होते. या तीन महिन्यांत ती पती बोनी कपूर याच्याशी बोलली देखील नाही. खुद्द श्रीदेवीने हे सांगितले. ‘सुमारे तीन महिने मी माझ्या पतीशी पती म्हणून बोलले नाही. सकाळी उठल्यावर मी केवळ त्याला गुड मॉर्निंग विश करायचे आणि मग रात्री थेट गुड नाईट विश करायचे. तीन महिन्यात आम्ही हेच काय एकमेकांशी बोललो. मी चित्रपटाच्या शेड्यूलदरम्यान पूर्णपणे डायरेक्टर म्हणेल तसेच वागते. ‘मॉम’च्या शूटींगदरम्यान मी केवळ आणि केवळ दिग्दर्शक रवि उदयावर यांना फॉलो करत होते,’ असे श्रीदेवीने सांगितले.

ALSO READ : Trailer Out : श्रीदेवीच्या ‘मॉम’चे ट्रेलर रिलीज!

‘मॉम’ या चित्रपटात श्रीदेवीने देवकीची भूमिका साकारली आहे. मुलीला संकटातून वाचवणारी आई तिने या चित्रपटात साकारली आहे.श्रीदेवीशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अक्षय खन्ना यांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. गत ३ जूनला या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च झाले.  ट्रेलरच्या पहिल्या भागात श्रीदेवीचा तर दुसºया भागात नवाजुद्दीनचाच जलवा बघावयास मिळतो. आता या चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा असून, बॉक्स आॅफिसवर काय करिष्मा दाखविणार याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. 

Web Title: Sridevi has not spoken to Bonnie Kapoor for three months! But why?