​ संयमी खेरचा हॉट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 13:22 IST2017-01-06T13:22:14+5:302017-01-06T13:22:14+5:30

मिर्झिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री संयमी खेरचा एकदम हॉट अंदाज सर्वांच्या समोर आला आहे. संयमीचे नुकतेच काही ...

Spicy Kher's Hot Prediction | ​ संयमी खेरचा हॉट अंदाज

​ संयमी खेरचा हॉट अंदाज

र्झिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री संयमी खेरचा एकदम हॉट अंदाज सर्वांच्या समोर आला आहे. संयमीचे नुकतेच काही बिकिनीतील फोटो सोशलसाईट्सवर चर्चेचा विषय बनले आहेत. संयमीने किंगफिशर या मॅगझीनसाठी फोटोशूट केलेले आहे. यामध्ये तिने परिधान केकेली बिकिनी लक्ष वेधून घेत आहे तर तिची स्लीम अ‍ॅन्ड ट्रीम फिगर देखील या फोटोमध्ये आकर्षक दिसत आहे. संयमीची मिर्झिया मधील भूमिका प्रेक्षकांना आवडली असली तरी हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा यशस्वी झालेला नाही. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर देखील यामध्ये संयमी सोबत झळकला होता. संयमीने केवळ बॉलिवूडच नाही तर साऊथमधील एक चित्रपट देखील केला अहे. सध्या ती या बिकिनीतील फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. संयमी एक उत्कृष्ठ क्रिकेटर देखील आहे. ती मुलींच्या भारतीय क्रिकेट संघासाठी खेळली देखील होती. परंतू तिने सध्या चित्रपटांमध्ये पाऊल ठेवल्याने तिला खेळाला रामराम ठोकावा लागला आहे. संयमीचा पहिलाच चित्रपट फारसा चालला नसला तरी तिच्या कातिलाना अंदांमुळे नक्कीच तिला ग्लॅमरस भूमिका असलेल्या चित्रपटांसाठी विचारणा होऊ शकते. त्यामुळे जर आता ही मिर्झिया गर्ल एखादया बोल्ड भूमिकेत प्रेक्षकांना दिसली तर जास्त आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण संयमीचे हे फोटोशूट पाहता ती नक्कीच एखादी ग्लॅमरस रोल चांगल्या रितीने निभावू शकते असेच दिसतेय. पण ते काहीही असले तरी संयमीच्या या हॉट बिकिनी अवतारातील फोटोंनी मात्र सध्या सोशलसाईट्सवर धुमाकूळ घातला आहे. 

Web Title: Spicy Kher's Hot Prediction