फोटोतल्या 'या' लहानग्याला ओळखलं का? महाराष्ट्राचा जावई असून करतोय साऊथवर राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 07:00 AM2023-03-13T07:00:00+5:302023-03-13T07:00:00+5:30

Actor: सध्या सोशल मीडियावर एका लहानग्या मुलाचा फोटो व्हायरल होत आहे. हा चिमुकला आज महाराष्ट्राचा जावई असून दाक्षिणात्य कलाविश्वातील सुपरस्टारही आहे.

south star mahesh babu childhood photo viral on social media | फोटोतल्या 'या' लहानग्याला ओळखलं का? महाराष्ट्राचा जावई असून करतोय साऊथवर राज्य

फोटोतल्या 'या' लहानग्याला ओळखलं का? महाराष्ट्राचा जावई असून करतोय साऊथवर राज्य

googlenewsNext

सोशल मीडियाच्या माध्यमातून आज दूरवर असलेली व्यक्तीदेखील अगदी आपल्या जवळ असल्यासारखी वाटते. त्यामुळेच कलाकार मंडळीदेखील याच सोशल मीडियाचा वापर करुन आपल्या चाहत्यांच्या थेट संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. यात बऱ्याचदा ही कलाकार मंडळी त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल जीवनातील अनेक गोष्टी, किस्से, घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात अनेकदा ते आपल्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा देतात. सध्या सोशल मीडियावर एका लहानग्या मुलाचा फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा चिमुकला आज महाराष्ट्राचा जावई असून दाक्षिणात्य कलाविश्वातील सुपरस्टारही आहे.

कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यामुळे अनेकदा ते त्यांच्या कॉलेज जीवनातील वा बालपणीचे फोटो शेअर करुन जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. यात सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू (mahesh babu) याच्या फोटोची चर्चा रंगली आहे. महेश बाबूने इन्स्टाग्रामवर त्याच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे.

महेश बाबूने बालकलाकार म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं असून त्याने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उत्तम अभिनयासह स्मार्टनेसमुळे आज तो तरुणींच्या गळ्यातलं ताईत झाला आहे. विशेष म्हणजे महेश बाबूचा मोठा फिमेल फॅनफोलोअर्स आहे. मात्र, हा साऊथ हिरो चक्क एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला. 

महेश बाबूने बॉलिवूड अभिनेत्री आणि महाराष्ट्राची लेक नम्रता शिरोडकर (namrata shirodkar) हिच्याशी लग्न केलं आहे. या दोघांचं लव्हमॅरेज असून त्यांना दोन मुलंदेखील आहेत. 2000 मध्ये नम्रताने ‘वामसी’ हा तेलगू सिनेमा साईन केला. या चित्रपटात महेश बाबूने स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे याच सिनेमाच्या दरम्यान दोघांचं सूत जुळलं आणि त्यांनी 10 फेब्रुवारी 2005 रोजी लग्न केलं.  सध्या ही जोडी हैदराबादला राहते.
 

Web Title: south star mahesh babu childhood photo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.