'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 11:33 IST2025-12-16T11:31:48+5:302025-12-16T11:33:41+5:30
'धुरंधर' सिनेमात रहमान डकैतच्या मोठ्या मुलाचा खून होतो तेव्हा हॉस्पिटलमध्ये बघायला आलेली त्याची पत्नी त्याच्या कानाखाली मारते. 'धुरंधर'मधील हा सीन प्रचंड व्हायरल झाला आहे. या सीनवर आता सौम्या टंडनने प्रतिक्रिया दिली आहे.

'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
'धुरंधर' हा बॉलिवूड सिनेमा सध्या सर्वत्र गाजत आहे. केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर प्रेक्षकांच्या मनावरही 'धुरंधर' राज्य करत आहे. 'धुरंधर' सिनेमातील कलाकारांच्या अभिनयाचं कौतुकही होत आहे. रणवीर सिंगसोबतच अक्षय खन्नाच्या अभिनयाने चाहते भारावून गेले आहेत. 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाने पाकिस्तानातील गँगस्टर असलेल्या रहमान डकैतची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री सौम्या टंडन रहमान डकैतच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.
'धुरंधर' सिनेमात रहमान डकैतच्या मोठ्या मुलाचा खून होतो तेव्हा हॉस्पिटलमध्ये बघायला आलेली त्याची पत्नी त्याच्या कानाखाली मारते. 'धुरंधर'मधील हा सीन प्रचंड व्हायरल झाला आहे. या सीनवर आता सौम्या टंडनने प्रतिक्रिया दिली आहे. मिड डेला दिलेल्या मुलाखतीत सौम्या टंडन म्हणाली, "सिनेमात माझी भूमिका खूप छोटी असेल असं मला वाटलं होतं. मला सिनेमाची पूर्ण स्क्रिप्ट ऐकवण्यात आली नव्हती. त्यांना कथा सिक्रेट ठेवायची होती. सिनेमा दोन भागांत रिलीज होणारे हेदेखील मला माहीत नव्हतं. पण, आदित्य धरवर माझा विश्वास होता".
अक्षय खन्नासोबतच्या हॉस्पिटलमधील त्या सीनबाबत सौम्याने सांगितलं, "माझ्याकडून तो सीन नीट होत नव्हता. मला आदित्यने सांगितलं की फेक सीन करू नकोस. मी तेव्हा अक्षयला विचारलं होतं की मी तुला कानाखाली मारलं तर चालेल का? तेव्हा त्याने खूपच शांतपणे हो असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर मी हा सीन केला. मी त्याच्या कानाखाली मारल्यानंतर मलाच खूप वाईट वाटलं होतं. पण मी मोठ्या हिमतीने हा सीन पूर्ण केला. या सीनसाठी मला अक्षयच्या सात वेळा कानाखाली मारावी लागली होती".