Be Careful coronaच्या जाळ्यात सापडला खिलाडी कुमार, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 15:49 IST2020-03-12T15:48:57+5:302020-03-12T15:49:23+5:30
भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे.

Be Careful coronaच्या जाळ्यात सापडला खिलाडी कुमार, वाचा सविस्तर
कोरोना व्हायरसने जगभरात आपलं थैमान घातले आहे. आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमाची शूटिंग आणि प्रमोशनही काहीकाळ थांबवण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसचा वाढत धोका पाहत बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित सिनेमांच्या तारखांसह काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि अजय देवगण स्टारर आगामी सिनेमा सूर्यवंशी ही कोरोनाच्या कचाट्यात सापडला आहे. येत्या 24 मार्चला हा सिनेमा रिलीज होणार होता मात्र आता त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी सिनेमा यावर्षातला बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. मात्र सिनेमागृहातील कमी होणारी संख्या बघून मेकर्सने कदाचित रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असावा. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार अक्षय, रोहित शेट्टी, करण जोहर यांच्यात मीटिंग झाली. कोरोना व्हायरसमुळे सिनेमाचे पहिलं गाण्याच्या रिलीज देखील कॅन्सल केले.
कोरोनानं जगभरात थैमान घातल्यानं जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी महारोगराई घोषित करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आली नाही. आगामी दिवस व आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण व मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.