ट्रोलिंगला कंटाळून सूरज पांचोलीने इन्स्ट्राग्रामला केले बाय-बाय, फोटोसह सगळ्या पोस्ट केल्या डिलिट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 02:10 PM2020-08-22T14:10:07+5:302020-08-22T14:10:51+5:30

सुशांत आणि दिशाच्या मृत्युनंतर सूरज पांचोलीचे नाव जोडले गेल्याने त्याने आपल्या बचावात स्पष्टीकरण दिले होते.

Sooraj Pancholi Quits Instagram says hopefully wil see You Again | ट्रोलिंगला कंटाळून सूरज पांचोलीने इन्स्ट्राग्रामला केले बाय-बाय, फोटोसह सगळ्या पोस्ट केल्या डिलिट

ट्रोलिंगला कंटाळून सूरज पांचोलीने इन्स्ट्राग्रामला केले बाय-बाय, फोटोसह सगळ्या पोस्ट केल्या डिलिट

googlenewsNext

सुशातच्या मृत्युनंतर सूरज पांचोलीवरही शंका उपस्थित केली जात आहे. मॅनेजर दिशा सालियनचे सूरज पांचोलीसह अफेअर असल्याचे माहिती समोर आल्यानंतर त्याच्याविषयी उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. याच कारणामुळे सूरज पांचोलीला सोशल मीडियावर टार्गेट केले जात आहे. रोज त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. या सर्व बाबींकडे पाहता सूरज पंचोलीने एक मोठे पाऊल उचलले आहे. इंस्टाग्राम त्याने एका फोटोशिवाय सर्व पोस्ट देखील डिलीट केल्या आहेत. रोजच्या ट्रोलिगंला वैतागुण अखेर त्याने इन्स्ट्राग्रामचे अकाऊंट डिलीट केले आहे. जाता-जाता त्याने एक पोस्टही शेअर केली आहे. यात चांगल्या गोष्टींसह, चांगल्या वेळी पुन्हा भेट होईल असे सांगत त्यान इन्स्टाग्रामवर राम राम ठोकला आहे.

सुशांत आणि दिशाच्या मृत्युनंतर सूरज पांचोलीचे नाव जोडले गेल्याने त्याने आपल्या बचावात स्पष्टीकरण दिले होते. त्याने म्हटले होते की, सुशांतसह माझे कधीच वैर नव्हते? दिशाला मी ओखळत नाही त्यामुळे तिच्या मृत्युशी माझा काहीही संबंबध नाही,  मी तिला कधीच भेटलेलो नाही. सुशांच्या निधनानंतर दिशाच्या मृत्युविषयी चर्चा होत गेली तेव्हा मला झालेला प्रकार कळाला. दिशाच्या कुटुंबियांच्या दुःख मी समजू शकतो. दुसरे  सलमान खान मला वाचवत असल्याचे बोलले जात आहे, तो माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करत असल्याचे बोलले जात आहे.त्याला व्यतिरिक्त दुसरे कोणते काम नाही का? असे सांगितले होते.

तर दुसरीकडे सूरज पांचोलीचे वडिल आदित्या पांचोलीनेही नवा वाद ओढावून घेतला आहे. सुशांत सिंह प्रकरणात मी चुकीचे ठरले तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेन असं कंगना रणौतने म्हटलं होतं. यावरून आदित्य पांचोलिने कंगणाला निशाणा साधत म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात कंगना रणौत चुकीची आहे. तिनं आपला पद्मश्री पुरस्कार परत करायला हवा, असं आदित्यने म्हटलं आहे.

Web Title: Sooraj Pancholi Quits Instagram says hopefully wil see You Again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.