Amitabh bachchan Birthday बिग बींचा वाढदिवस साजरा करणार सोनी मॅक्स २

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 06:00 IST2018-10-09T17:00:25+5:302018-10-11T06:00:00+5:30

बिग बी म्हणजे अभिनयाचे बादशहा. चार दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक भूमिका वठवल्या आहेत. या आठवड्यात म्हणजेच 11 ऑक्टोबरला ते ७६ वर्षांचे होत आहेत.

Sony Max 2 will celebrate Amitabh Bachchan birthday with Satte pe satta, Parvarish, Don and Bhoothnath | Amitabh bachchan Birthday बिग बींचा वाढदिवस साजरा करणार सोनी मॅक्स २

Amitabh bachchan Birthday बिग बींचा वाढदिवस साजरा करणार सोनी मॅक्स २

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा महानायक मानले जाते. त्यांनी बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. अभिताभ यांचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड असून त्यांच्या चित्रपटातील भूमिका, संवाद त्यांच्या फॅन्सचे तोंडपाठ आहेत. या आठवड्यात म्हणजेच 11 ऑक्टोबरला ते ७६ वर्षांचे होत आहेत! बिग बी म्हणजे अभिनयाचे बादशहा. चार दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक भूमिका वठवल्या आहेत. पडद्यावरील सर्वोत्कृष्ट कलाकार ते सर्वात लोकप्रिय होस्ट असा त्यांचा प्रवास वाखाण्याजागा आहे. या शहेनशहाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सोनी मॅक्स ११ ऑक्टोबर २०१८ रोजी दिवसभर त्यांचे चार एव्हरग्रीन सिनेमे दाखवणार आहे.

सत्ते पे सत्ता
वाढदिवसाचा हा सोहळा सोनी मॅक्स२ वर सुरू होईल बिग बी यांच्या सर्वोत्कृष्ट अॅक्शन कॉमेडी सत्ते पे सत्ता या सिनेमाने.
रवीवर प्रेम करणारी इंदू त्याच्या संस्कारहीन भावांना बघून घाबरते, पण नंतर त्यांना सुधारण्याचा ती निर्णय घेते. त्यातील एक भाऊ ज्या मुलीच्या प्रेमात पडतो तिचे काका संपत्तीसाठी तिला मारायला हुबेहूब रवीसारख्या दिसणाऱ्या इसमाला पाठवतात. सत्ते पे सत्ता हा एक सर्वोत्कृष्ट अॅक्शन कॉमेडी सिनेमा मानला जातो. बिग बींच्या बर्थडेच्या सोहळ्याची सुरुवात करण्यासाठी सकाळी १० वाजता हा सिनेमा दाखवला जाणार आहे.

परवरिश
एका दुष्ट डाकूच्या मुलाला अमितला डीएसपी समशेर सिंग दत्तक घेतात. मात्र, त्यांचा स्वत:चा मुलगा किशन अंडरवर्ल्डच्या गँगसाठी काम करतो आणि अमित एक इमानदार पोलिस अधिकारी बनतो, ज्याच्‍याकडे या गँगला पकडण्याची जबाबदारी आहे. या सुपरस्टारचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हा अॅक्शन क्राइम ड्रामा सोनी मॅक्स२ वर दुपारी १ वाजता प्रेक्षकांना पाहाता येईल.

डॉन
पोलिसांनी वाँटेड जाहीर केलेला एक गुन्हेगार पोलिस चकमकीत मारला जातो. डीएसपी डिसिल्व्हा यांनाच फक्त या मृत्यूबद्दल माहीत असते. त्यामुळे, डॉनसारख्याच दिसणाऱ्या विजयला योग्य प्रशिक्षण देऊन ते या गँगवर ताबा मिळवू पाहतात. मात्र, विजयला पोलिसांकडूनही धोका आहे आणि त्याच्या गँगमधूनही. हा सिनेमा दुपारी ४ वाजता सोनी मॅक्स २वर दाखवण्यात येणार आहे.

भूतनाथ
नव्या घरात रहायला आलेल्या एका कुटुंबाला तिथे एक भूत असल्याचे कळते. हे भूत त्यांना या घरातून हाकलून लावण्यासाठी प्रयत्न करत असते. मात्र, त्याचा दृष्टिकोनच बदलून टाकणाऱ्या एका छोट्या मुलामुळे ते भूत या कुटुंबाचा मित्र बनते.

Web Title: Sony Max 2 will celebrate Amitabh Bachchan birthday with Satte pe satta, Parvarish, Don and Bhoothnath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.