सोनू सूदला करायचंय मराठी चित्रपटात काम, व्यक्त केली इच्छा

By तेजल गावडे | Updated: October 27, 2021 19:34 IST2021-10-27T19:33:53+5:302021-10-27T19:34:15+5:30

सोनू सूदने मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

Sonu Sood wants to work in Marathi film, expressed desire | सोनू सूदला करायचंय मराठी चित्रपटात काम, व्यक्त केली इच्छा

सोनू सूदला करायचंय मराठी चित्रपटात काम, व्यक्त केली इच्छा

कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेक गरजूंसाठी अभिनेता सोनू सूद देवदूत ठरला. अद्याप त्याचे हे मदतकार्य अजूनही सुरू आहे. या कामामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जगभरात त्याचे असंख्य चाहते आहेत. अभिनेता नाही तर गरीबांचा देवदूत म्हणून लोक त्याची पूजा अर्चा करतात. दररोज त्याची मनोभावे लोक पूजा करतात. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांमुळे सोनू सूद चर्चेत असतो. सोनू सूद नॅशनल जिओग्राफीक इंडिया वाहिनीवरील दहा भागांची सीरिज 'इट हॅपेन्स ओन्ली इन इंडिया' या शोचे सूत्रसंचालन करताना दिसतो आहे.

लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूदने मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला की, माझी मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. जर चांगली स्क्रीप्ट मिळाली तर नक्कीच काम करायला आवडेल. मराठी चित्रपटांच्या कथा खूप छान असतात. मला मराठीत इंटरेस्टिंग स्क्रिप्ट मिळाली तर मी नक्कीच मराठी भाषेतही काम करू शकेन. 


सोनू सूदने त्याच्या नवीन शोबद्दल सांगितले की, 'इट हॅपेन्स ओन्ली इन इंडिया' या शोमध्ये देशातील लोकांच्या यशोगाथा सांगण्यात येत आहे. देशातील एका कोपऱ्यातील एका यशस्वी व्यक्तीची किंवा कंपनीच्या यशामागची कहाणी समोर येणार आहे. यातून आपल्याला फक्त प्रेरणाच मिळत नाही तर लोकांचे आयुष्य बदलून टाकते. 'इट हॅपेन्स ओन्ली इन इंडिया' ही अशाच लोकांची, जागांची कहाणी आहे. जी पूर्ण देशाला सांगणार आहोत. अशा कथा सांगण्यासाठी माझी निवड झाल्याचा मला अभिमान वाटतो.बालपणी मला कथा ऐकायला जेवढी मजा आली तेवढीच मजा आता सांगायला येत आहे. कारण लोकांना आम्ही प्रेरीत करत आहोत आणि मी स्वतःही प्रेरीत झालो आहे.  

Web Title: Sonu Sood wants to work in Marathi film, expressed desire