सोनू सूदने केली कोरोनावर मात, त्याची पोस्ट वाचून खूश झाले चाहते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 18:40 IST2021-04-23T18:38:13+5:302021-04-23T18:40:27+5:30

सोनूनेच ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. सोनूची ही पोस्ट वाचून त्याचे चाहते प्रचंड खूश झाले आहेत.

Sonu Sood tests negative for Covid-19 | सोनू सूदने केली कोरोनावर मात, त्याची पोस्ट वाचून खूश झाले चाहते

सोनू सूदने केली कोरोनावर मात, त्याची पोस्ट वाचून खूश झाले चाहते

ठळक मुद्देसोनू सूदने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे.

सोनू सूदला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. पण त्याने आता कोरोनावर मात केली असून त्यानेच ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. सोनूची ही पोस्ट वाचून त्याचे चाहते प्रचंड खूश झाले आहेत. 

सोनू सूदने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्याच त्याने मास्क घातलेला असून हाताच्या बोटांनी खुणा करत तो मी निगेटिव्ह झालो असे सांगत आहे. 

सोनू सूदने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यात लिहिले होते की, नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी कोव्हिड १९ टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. काळजी करण्याची गोष्ट नाही. उलट, तुमच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी माझ्याकडे आता आधीपेक्षा जास्त वेळ असेल. लक्षात ठेवा, कोणत्याही अडचणीत.. मी तुमच्यासोबत आहे.

सोनू सूदला कोरोना झाल्याचे समजताच त्याच्या चाहत्यांना त्याची चिंता वाटत होती आणि ते काळजी घ्यायला सांगत होते. तसेच त्याची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून त्यांनी प्रार्थना केली होती. 

Web Title: Sonu Sood tests negative for Covid-19