Odisha Accident मधील अपघातग्रस्तांसाठी सोनू सूदने सरकारला केले हे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 07:29 PM2023-06-03T19:29:01+5:302023-06-03T19:29:27+5:30

Sonu Sood on odisha train accident death : ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Sonu Sood appealed to the government for the victims of the Odisha accident | Odisha Accident मधील अपघातग्रस्तांसाठी सोनू सूदने सरकारला केले हे आवाहन

Odisha Accident मधील अपघातग्रस्तांसाठी सोनू सूदने सरकारला केले हे आवाहन

googlenewsNext

ओडिशा रेल्वे अपघाता(odisha train accident)च्या बातमीने शनिवारची सकाळ संपूर्ण देशासाठी धक्कादायक ठरली आहे. या हल्ल्यात २०० हून अधिक लोकांनी आपला जीव गमवला आणि ९०० हून जास्त जण जखमी झाले. भारतीय चित्रपट इंडस्ट्री , कलाकार सगळेच सोशल मीडिया वरून त्यांचं दुःख व्यक्त करत असून पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पाठिंबा देत आहेत. या सगळ्या प्रकारात अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) पीडितांच्या कुटुंबासाठी काहीतरी अनोखी मदत करण्याची इच्छा बाळगत आहे. 

अभिनयाच्या सोबतीने गरजूंना मदत करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेण्यासाठी अभिनेता सोनू सूद ओळखला जातो. या अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्याने अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आणि पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना पाठींबा दिला आहे. या व्हिडिओमध्ये सोनूने सांगितले की, पीडितांना भरपाई दिली जाऊ शकते परंतु  दीर्घ काळासाठी त्यांचे आयुष्य सुरक्षित राहण्यासाठी त्याने राज्य आणि केंद्र सरकारला हात जोडून अशा दुःखद अपघातातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी काही निश्चित उत्पन्न धोरण तयार करण्यात यावे असे आवाहन केले. 


सोनू सूद म्हणतो की सरकारकडून नियमित आर्थिक मदत मिळाल्याने ज्या लोकांनी आपली जवळची लोक गमावली त्यांना दीर्घकाळ त्रास होणार नाही.. सोनूने या घटने बद्दल दुःख व्यक्त केले आहे.

Web Title: Sonu Sood appealed to the government for the victims of the Odisha accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.