Video: सोनू निगमच्या कॉन्सर्टमध्ये दिसला 'हा' हँडसम स्टारकिड; तुम्ही ओळखलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 16:49 IST2025-11-10T16:43:45+5:302025-11-10T16:49:44+5:30
सोनू निगमच्या कॉन्सर्टमध्ये दिसलेल्या या स्टारकिडची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. तुम्ही ओळखलं?

Video: सोनू निगमच्या कॉन्सर्टमध्ये दिसला 'हा' हँडसम स्टारकिड; तुम्ही ओळखलं?
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक सोनू निगमचा 'सतरंगी रे' टूर सध्या चर्चेत आहे. या टूरची सुरुवात नुकतीच मुंबईतून झाली, जिथे सोनू निगमने आपल्या दमदार परफॉर्मन्सने श्रोत्यांची मनं जिंकली. मात्र, या कॉन्सर्टमध्ये सोनू निगमपेक्षाही एका स्टारकिडची चर्चा झाली. साधा तरीही आकर्षक लूक करुन या स्टारकिडने सर्वांचं लक्ष वेधलं. कोण आहे तो?
सोनू निगमच्या कॉन्सर्टमध्ये दिसलेला तो कोण?
सोनू निगम यांच्या कॉन्सर्टमध्ये दिसलेला हा स्टारकिड दुसरा तिसरा कोणी नसून तो सोनू निगमचा मुलगा नेवान आहे. सोशल मीडियावर नेवानच्या लूकची चर्चा सुरू झाली. नेटकरी त्याला ओळखूही शकले नाहीत, कारण तो आता पूर्वीपेक्षा खूप बदलला आहे. काळ्या रंगाची पॅन्ट आणि जॅकेट परिधान केलेला नेवान अतिशय हँडसम आणि चॉकलेटी बॉय लूकमध्ये दिसत होता. त्याचे कुरळे केस आणि हसतमुख खेळकर स्वभावाने चाहत्यांचं मन जिंकलं आहे.
नेवानचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात तो कॉन्सर्टमध्ये स्टेजच्या बॅकस्टेजवर उभा राहून आपल्या वडिलांचा परफॉर्मन्स अभिमानाने पाहत आणि एन्जॉय करताना दिसत आहे. सोनू निगमने नेहमीच त्याचा मुलगा नेवानला, प्रसिद्धीच्या झोतापासून दूर ठेवले होते. नेवान लहान असताना त्याने 'कोलावेरी डी' या गाण्याचं एक कडवं गायलं होतं. ज्यामुळे तो खूप चर्चेत आला होता. यानंतर सोनू निगमने त्याला लाइमलाईटपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला.
मात्र, इतक्या वर्षांनंतर नेवानला अचानक कॉन्सर्टमध्ये अशा बदललेल्या आणि आकर्षक लूकमध्ये पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. नेवानचा हा व्हिडीओ व्हायरल होताच युजर्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट केली, "हा किती मोठा झाला आहे!" तर दुसऱ्याने लिहिले, "तो ज्या अभिमानाने वडिलांकडे पाहतोय, ते खूप कमाल आहे." आणखी एका चाहत्याने, "नेवान... लहानपणी खूप गोंडस होता आणि आता वडिलांसारखाच खूप हँडसम झाला आहे," अशी प्रतिक्रिया दिली.