‘माझ्या मुलाने भारतात तरी गायक बनू नये...’; सोनू निगमचे ‘बिगडे बोल’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 10:37 IST2020-11-17T10:34:15+5:302020-11-17T10:37:18+5:30

चाहत्यांनी सोनूवर भरभरून प्रेम केले. मात्र अनेकदा वाद ओढवून घेतल्याने याच सोनूला चाहत्यांची टीकाही  सहन करावी लागली.

sonu nigam does not wants his son to be singer atleast in india | ‘माझ्या मुलाने भारतात तरी गायक बनू नये...’; सोनू निगमचे ‘बिगडे बोल’!!

‘माझ्या मुलाने भारतात तरी गायक बनू नये...’; सोनू निगमचे ‘बिगडे बोल’!!

ठळक मुद्देअलीकडे सोनूने एक व्हिडीओ शेअर करत बॉलिवूडच्या म्युझिक इंडस्ट्रीमधील घराणेशाहीवर टीका केली होती.

आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक सोनू निगम त्याच्या परखड वक्तव्यांसाठीही ओळखला जातो. चाहत्यांनी सोनूवर भरभरून प्रेम केले. मात्र अनेकदा वाद ओढवून घेतल्याने याच सोनूला चाहत्यांची टीकाही  सहन करावी लागली. आता सोनू असे काही बोलला की सगळेच हैराण झालेत. होय, माझ्या मुलाने गायक होऊ नये आणि झालाच तर किमान भारतात तरी त्याने गायक बनू नये, असे सोनू म्हणाला.

नुकतेच सोनूचे ‘ईश्वर का वो सच्चा बंदा’ हे गाणे रिलीज झाले. यानिमित्ताने ‘टाईम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत सोनूला त्याच्या पर्सनल लाईफबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. तुझ्या मुलालाही तुझ्यासारखा सिंगर बनायचे आहे का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर सोनू जे काही बोलला ते ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

काय म्हणाला सोनू?
‘खरे सांगू, त्याने सिंगर बनावे, अशी माझीही इच्छा नाही. कमीत कमी भारतात तरी नाहीच. तसाही तो आता भारतात राहत नाही. तो दुबईत राहतो. त्याला मी आधीच भारताबाहेर पाठवले होते,’ असे सोनू म्हणाला.
‘माझा मुलगा सध्या दुबईमध्ये आहे. तो उत्तम गातो. पण त्यालाही सिंगर व्हायची इच्छा नाही. त्याला गेमिंगमध्ये खूप रस आहे. तो युएईचा टॉप गेमर आहे. एक गेम फोर्टनाइट आहे आणि तो त्याचा टॉप गेमर आहे. तो खूप हुशार आहे. त्यात अनेक चांगले गुण आहेत. मी त्याच्यावर माझे निर्णय लादू इच्छित नाही. त्याची इच्छा काय आहे, ते बघू,’ असेही पुढे तो म्हणाला.
काही वर्षांपूर्वी सोनूचा मुलगा नेवान निगमचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. यात नवीन ‘कोलावरी डी’ हे हिट सॉन्ग गाताना दिसला होता.

संगीतक्षेत्रातील घराणेशाहीवर केली होती टीका
अलीकडे सोनूने एक व्हिडीओ शेअर करत बॉलिवूडच्या म्युझिक इंडस्ट्रीमधील घराणेशाहीवर टीका केली होती.
म्युझिक इंडस्ट्रीतही  खूप मोठे माफिया बसलेले आहेत आणि मोजून दोन मोठ्या म्युझिक कंपनी आहेत जे निश्चित करतात की कोणता सिंगर गाणार आणि कोण नाही, असे तो म्हणाला होता.

  सुशांतच्या मृत्यूनंतर सोनू निगमने केला मोठा खुलासा, म्युझिक इंडस्ट्रीतील सांगितले वास्तव

माझ्याशी पंगा घेऊ नकोस, नाहीतर...! सोनू निगमचा भूषण कुमारला थेट इशारा,  वाचा काय म्हणाला

Web Title: sonu nigam does not wants his son to be singer atleast in india