SONG OUT : अखेर सुशांत सिंह राजपूतने क्रिती सॅननला म्हटलेच, ‘मैं तेरा बॉयफ्रेन्ड’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2017 15:34 IST2017-05-22T10:04:53+5:302017-05-22T15:34:53+5:30
आज सुशांत सिंह राजपूतने खरोखरीच तो क्रिती सॅननचा बॉयफ्रेन्ड असल्याचे मान्य केले. अर्थात रिअल लाईफमध्ये नाही तर रिल लाईफमध्ये. होय, ‘राबता’ या क्रिती व सुशांतच्या आगामी चित्रपटाचे ‘मैं तेरा बॉयफ्रेन्ड’ हे गाणे अगदी काही मिनिटांपूर्वी रिलीज झाले.

SONG OUT : अखेर सुशांत सिंह राजपूतने क्रिती सॅननला म्हटलेच, ‘मैं तेरा बॉयफ्रेन्ड’!
स शांत सिंह राजपूत आणि क्रिती सॅनन एकमेकांच्या प्रेमात आहेत, अशी चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून आपल्या कानावर येत आहे. अर्थात क्रिती व सुशांत दोघेही हे नाकारत आले आहेत. आम्ही केवळ एकमेकांचे चांगले मित्र आहोत, यापलीकडे काहीही नाही, असेच दोघेही सांगत आहेत. पण आज नंतर सुशांत व क्रिती यांचे हे उत्तर आपल्याला ऐकू येणार नाही. होय, कारण ‘मैं तेरा बॉयफ्रेन्ड’ असे सुशांतने क्रितीला अख्ख्या जगासमोर सांगितले आहे. होय, आम्ही खरे तेच सांगतोय. आज सुशांतने खरोखरीच तो क्रितीचा बॉयफ्रेन्ड असल्याचे मान्य केले. अर्थात रिअल लाईफमध्ये नाही तर रिल लाईफमध्ये. होय, ‘राबता’ या क्रिती व सुशांतच्या आगामी चित्रपटाचे ‘मैं तेरा बॉयफ्रेन्ड’ हे गाणे अगदी काही मिनिटांपूर्वी रिलीज झाले. आता तुम्हाला सगळे काही कळले असेलच. या गाण्यातील क्रिती व सुशांत या दोघांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री अफलातून आहे. केवळ एवढेच नाही तर या दोघांचे युनिक डान्स मुव्ह त्याहीपेक्षा अफलातून आहेत. काही सेक्सी मुव्हमध्ये क्रिती एकदम सेक्सी दिसतेय. अरिजीत सिंह आणि नेहा कक्कड या दोघांच्या आवाजातील हे गाणे ऐकल्यानंतर तुम्ही त्यावर थिरकल्याशिवाय राहणार नाही.
ALSO READ : ‘राबता’चा ट्रेलर आला... पाहा, सुशांत सिंह राजपूत व क्रिती सॅननची आॅनस्क्रीन केमिस्ट्री!
सुशांत सिंह यापूर्वी ‘एम एस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’मध्ये दिसला होता. यानंतर ‘राबता’मध्ये तो दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. होय, दोन जन्मांची कथा रंगवली गेली आहे. या गाण्यात सुशांत व क्रितीचा मॉडर्न अवतार दिसणार आहे. तेव्हा बघा तर आणि एन्जॉय करा, सुशांत-क्रितीच्या अफलातून केमिस्ट्री सोबतच काही युनिक डान्समुव्ह...!