SONG in new version : ‘मुबारकां’चे मिका सिंहच्या आवाजातील ‘हवा हवा...’ गाणे ऐकाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2017 14:42 IST2017-06-29T09:12:53+5:302017-06-29T14:42:53+5:30
अर्जुन कपूरच्या ‘मुबारकां’ या चित्रपटातील ‘हवा हवा...’ हे गाणे आज रिलीज झाले. हे गाणे ८० च्या दशकात असलेल्या गाण्याचा रिमिक्स आहे, हे तुम्हाला ठाऊक असेलच. अर्जुन कपूर आणि इलियाना डिक्रूज या दोघांना या गाण्यावर थिरकताना आपण पाहू शकणार आहोत.

SONG in new version : ‘मुबारकां’चे मिका सिंहच्या आवाजातील ‘हवा हवा...’ गाणे ऐकाच!
अ ्जुन कपूरच्या ‘मुबारकां’ या चित्रपटातील ‘हवा हवा...’ हे गाणे आज रिलीज झाले. हे गाणे ८० च्या दशकात असलेल्या गाण्याचा रिमिक्स आहे, हे तुम्हाला ठाऊक असेलच. अर्जुन कपूर आणि इलियाना डिक्रूज या दोघांना या गाण्यावर थिरकताना आपण पाहू शकणार आहोत. या गाण्यात इलियानाचा लूकही ८० च्या दशकाचा फिल देतोय. गाण्याचे शब्द पूर्णपणे बदलण्यात आले आहेत. एक नवा फ्लेवर आणि नवा अंदाज अशा रूपातील हे गाणे तुम्हाला आवडेल, असेच आहे.
जुन्या गाण्यांना नव्या रूपात सादर करण्याचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये सुरु आहे. यापूर्वी ‘ओके जानू’मध्ये ‘हम्मा हम्मा’ हे गाणे आपण पाहिले. ‘मशिन’मध्ये ‘तू चीज बडी है मस्त मस्त’चा तडका आपण अनुभवला.
‘हवा हवा’ हे ओरिजनल गाणे पाकिस्तानी गायक हसन जहांगीरने गायले होते. हेच गाणे नव्या व्हर्जनमध्ये मिका सिंहने गायले आहे. मिकाने गाण्याला असा काही साज चढवलायं की, तुम्ही त्यावर थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. बॉस्को मार्टिनने हे गाणे कोरिओग्राफ केले आहे. गाण्यात अर्जुन इलियानाची मनधरणी करताना दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. या ट्रेलरवरून एक गोष्ट स्पष्ट झाली होती, ती म्हणजे यात खूप सारी कॉमेडी आणि तेवढेच कन्फ्युजन असणार.आहे. यात अर्जुन कपूर डबलरोलमध्ये आहे. विशेष म्हणजे, पुतण्यासाठी अर्जुनचा काका अनिल कपूर मैदानात उतरला आहे. या चित्रपटात अनिलचा कॉमिक टायमिंग अफलातून आहे. अनिल व अर्जुन हे दोघेही प्रथमच या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.