सोनम - आनंद अहुजा भेटतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 16:40 IST2016-12-15T16:40:24+5:302016-12-15T16:40:24+5:30

बॉलिवूडची ‘मस्सकली गर्ल’ सोनम कपूर आणि बिझनेसमॅन आनंद अहुजा हे २०१७ मध्ये विवाहबद्ध होणार असल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले ...

Sonam - When Anand Ahuja meets ... | सोनम - आनंद अहुजा भेटतात तेव्हा...

सोनम - आनंद अहुजा भेटतात तेव्हा...

लिवूडची ‘मस्सकली गर्ल’ सोनम कपूर आणि बिझनेसमॅन आनंद अहुजा हे २०१७ मध्ये विवाहबद्ध होणार असल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले आहे. एक वर्षापासून ते  एकमेकांसोबत डेटिंग करत असून, नात्याला अधिकृत नाव देण्यात यावं या अपेक्षेनं त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आनंद अहुजा यांचा ‘ग्रँड स्टोअर लाँचिंग सोहळा’ दिल्लीत नुकताच पार पडला. यावेळी उपस्थित राहायला सोनम कशी विसरणार? तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून ती खास दिल्लीला रवाना झाली. लाँचिंग सोहळा हा तर केवळ एक बहाणा होता. सोनम आणि आनंदला भेटायला कुठले कारण लागत नाही. तिने हा सोहळा थोडक्यात आटोपला आणि लगेचच यूएसला तिच्या पुढील प्रोजेक्टसच्या कमिटमेंट्ससाठी रवाना झाली. 

आनंद अहुजा याच्या स्टोअर मधील कलेक्शनचा वापर करायला सोनमला प्रचंड आवडतं. तिने आत्तापर्यंत बूट्स आणि सिल्व्हर ज्वेलरीचा वापर केला आहे. ती आनंदच्या कलेक्शनचे उत्तम मार्केटिंग देखील करते. ‘मिर्झियाँ’ चित्रपटातील हर्षवर्धनचे कॉश्चुम हे आनंद अहुजा यांनी डिझाईन केलेलेच होते. 

Web Title: Sonam - When Anand Ahuja meets ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.