सोनमने ‘या’ फोटोतून शेअर केल्या जुन्या आठवणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 19:34 IST2016-12-23T19:34:28+5:302016-12-23T19:34:28+5:30
बॉलिवूडची चुलबुली गर्ल सोनम कपूर ही सध्या सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह दिसतेय. तिचे विविध प्रकारचे लुक्स, हेअरस्टाईल्स, सोहळयांमधील फोटो ...

सोनमने ‘या’ फोटोतून शेअर केल्या जुन्या आठवणी!
ब लिवूडची चुलबुली गर्ल सोनम कपूर ही सध्या सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह दिसतेय. तिचे विविध प्रकारचे लुक्स, हेअरस्टाईल्स, सोहळयांमधील फोटो ती सातत्याने चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने वडील अनिल कपूर, संजय कपूर आणि बोनी कपूर यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. हा फोटो अनिल कपूरच्या उमेदीच्या काळातील असावा असे दिसतेय. जुने दिवस, सेटवरील धम्माल, मस्ती या फोटोवरून जाणवतेय.
‘नीरजा’ फेम अभिनेत्री सोनम कपूर हिचे वडील अनिल कपूर यांच्यासोबत खुप घट्ट नाते आहे. वडीलांपेक्षाही जास्त त्या दोघांमध्ये मित्रत्वाचे नाते आहे. एकमेकांच्या निर्णयाला पाठिंबा देणे, प्रोजेक्टमध्ये मदत करणे या माध्यमातून सोनम आणि मुलगा हर्षवर्धनही अनिल कपूर यांना मदत करत असतात. सोनमने शेअर केलेल्या या फोटोला तिने ‘थ्रोबॅक कपूर्स इन आॅन देअर ग्लोरी!’ असे कॅप्शन दिले आहे. १९९०च्या दशकात घेऊन जाणाऱ्या या फोटोत अनिल निळ्या रंगाच्या, बोनी काळ्या-निळ्या रंगातील शर्टमर्ध्य तर संजय कपूर लाल-काळ्या शर्टमध्ये दिसत आहेत.
![]()