सोनमला आवडतं सुंदर दिसणं..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 17:39 IST2016-11-16T17:39:23+5:302016-11-16T17:39:23+5:30

सुंदर दिसणं कुणाला आवडत नाही? प्रत्येक व्यक्तीला आपण सुंदर दिसावं, लोकांनी आपलं कौतुक करावं.. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. ‘बॉलिवूडची ...

Sonam liked beautiful. | सोनमला आवडतं सुंदर दिसणं..

सोनमला आवडतं सुंदर दिसणं..

ंदर दिसणं कुणाला आवडत नाही? प्रत्येक व्यक्तीला आपण सुंदर दिसावं, लोकांनी आपलं कौतुक करावं.. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. ‘बॉलिवूडची मस्सकली गर्ल’ सोनम कपूर हिचेच बघा, तिलाही सुंदर दिसायला आवडतं. 

‘फॅशनिस्टा’ सोनम कपूर बॉलिवूडमध्ये एक हरहुन्नरी कलाकार म्हणून ओळखली जाते. सौंदर्याची सोनमची स्वत:ची एक व्याख्या आहे. ती म्हणते, ‘बी टाऊनमध्ये मी फॅशन आयकॉन म्हणून नव्हे तर एक कलाकार म्हणून वावरते. स्वत:ला आवडेल असे तयार होणे हेच माझ्यासाठी सुंदर दिसणे आहे. दुसऱ्यासाठी मी कधीच चांगलं दिसण्याचा प्रयत्न करत नाही. मला फॅशन आणि कपडे आवडतात म्हणून तयार व्हायला आवडतं. फॅशनचा अर्थ चित्रविचित्र कपडे घालणं असा नव्हे. तर ज्या कपड्यांत आपल्याला कम्फर्टेबल वाटते, ती म्हणजे फॅशन. आपण सुंदर दिसत असलो की, आपला आत्मविश्वास वाढतो. 

एक अभिनेत्री म्हणून सोनम सोशल मीडियावर खुप अ‍ॅक्टिव्ह असते. सामाजिक विषय, देशासमोरील प्रश्न, घटना याबद्दल ती हिरहिरीने मत मांडत असते.  

Web Title: Sonam liked beautiful.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.